शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
2
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
3
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
4
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
6
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
7
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
8
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
9
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
10
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
11
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
12
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
13
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
14
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
15
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
16
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
17
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
18
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
19
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
20
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा

राम जेठमलानींच्या स्मृतींनी गहिवरले यवतमाळचे विधी वर्तुळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2019 8:40 PM

या व्याख्यानाच्या निमित्ताने जिल्हाभरातील न्यायाधीश, वकील, कायद्याचे अभ्यासक, महाविद्यालयीन विद्यार्थी या सर्वांना सुवर्णसंधी चालून आली होती.

- अविनाश साबापुरे

यवतमाळ : देशातील मातब्बर वकील आणि माजी केंद्रीय कायदा मंत्री राम जेठमलानी यांच्या निधनाचे वृत्त धडकताच जिल्ह्याच्या विधी वर्तुळात काम करणारी प्रत्येक व्यक्ती गहिवरली. कारण अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेणा-या या ज्येष्ठ विधिज्ञाने अगदी काही वर्षापूर्वीच यवतमाळ सारख्या ठिकाणी येऊन ग्रामीण भागात विधीसेवा देणा-यांचे कान तृप्त केले होते. 

निमित्त होते स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित व्याख्यानमालेचे. तो दिवस होता २४ नोव्हेंबर २०१३. येथील अमोलकचंद विधी महाविद्यालयात विधी व न्याय शास्त्र ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. व्याख्यानमालेचे पहिलेच पुष्प राम जेठमलानी यांच्या अनुभवसंपन्न वक्तृत्वाने गाजविले. ‘भारतीय घटनेंतर्गत धर्मनिरपेक्षता’ हा त्यांचा विषय होता. 

या व्याख्यानाच्या निमित्ताने जिल्हाभरातील न्यायाधीश, वकील, कायद्याचे अभ्यासक, महाविद्यालयीन विद्यार्थी या सर्वांना सुवर्णसंधी चालून आली होती. त्यामुळेच हे व्याख्यानही अविस्मरणीय ठरले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी खासदार विजय दर्डा होते. तर व्यासपीठावर विद्या प्रसारक मंडळाचे सचिव अ‍ॅड. प्रकाश चोपडा, अमोलकचंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.ए. मिश्रा उपस्थित होते. 

प्रेरणास्थळी वृक्षारोपणविधी महाविद्यालयातील व्याख्यानापूर्वी अ‍ॅड. राम जेठमलानी यांनी प्रेरणास्थळावर येऊन स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांना आदरांजली अर्पण केली. तसेच प्रेरणास्थळ परिसरात त्यांनी वृक्षारोपणही केले. याभेटीच्या निमित्ताने यवतमाळातील कायद्याच्या अभ्यासकांना अ‍ॅड. राम जेठमलानी यांचा अत्यंत जवळून सहवास लाभला त्या संदर्भात बोलताना अ‍ॅड. प्रवीण जानी म्हणाले, या व्याख्यानामुळे आम्हाला कधीही न संपणारी शिदोरी मिळाली. तर डॉ. विजेश मुणोत म्हणाले, कायद्यासारखा विषय असूनही अ‍ॅड. राम जेठमलानी यांनी सर्वांना कळेल अशा नर्मविनोदी पद्धतीने व्याख्यान दिले होते. 

विजय दर्डा यांच्या हस्ते हृदयस्पर्शी स्वागत यावेळी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी खासदार विजय दर्डा यांनी गौरवपत्र प्रदान करून राम जेठमलानी यांचे यवतमाळकरांच्यावतीने हृदयस्पर्शी स्वागतही केले होते. त्यानंतर यवतमाळ बार असोसिएशनच्यावतीने अ‍ॅड.ए.पी. दर्डा, सिंधी समाजाच्यावतीने अ‍ॅड. जे.व्ही. वाधवाणी, अमोलकचंद विधी महाविद्यालयाचे प्रा.डॉ.विजेश मुणोत यांनीही स्वागत केले. 

शंभराव्या वाढदिवसाची यवतमाळकरांची इच्छा अपूर्णअ‍ॅड. राम जेठमलानी यांचे २०१३ मध्ये यवतमाळच्या अमोलकचंद विधी महाविद्यालयात व्याख्यान झाले. त्यावेळी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी खासदार विजय दर्डा म्हणाले होते, माझ्या मित्रांपैकी ९१ वर्षीय राम जेठमलानी हे सर्वात तरुण व्यक्ती होय. त्यांचा शंभरावा वाढदिवस आपणास साजरा करावयाचा आहे. विजय दर्डा यांचे हे मनोगत ऐकताच सर्व श्रोत्यांनी ‘यवतमाळ-यवतमाळ’ अशी साद घातली. मात्र शंभरावा वाढदिवस गाठण्यापूर्वीच अ‍ॅड. राम जेठमलानी यांचे निधन झाले आणि यवतमाळकरांची इच्छाही अपूर्ण राहिली.

जिल्हाभरातून श्रोत्यांची गर्दीदेशपातळीवर गाजलेले खटले चालविणारे ज्येष्ठ वकील अ‍ॅड. राम जेठमलानी साक्षात यवतमाळात येऊन व्याख्यान देणार हे कळताच जिल्हाभरातील चाहत्यांनी अमोलकचंद विधी महाविद्यालयात गर्दी केली होती. अ‍ॅड. जेठमलानी यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी जिल्हा आणि तालुका पातळीवरील न्यायालयांमध्ये काम करणारे सर्व न्यायाधीश, वकील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि विद्यार्थ्यांनीही मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. 

कार्ल मार्स्कने धर्माला अफुची गोळी संबोधले असले तरी भारतीय संविधान सभेने धर्माबाबत अतिशय चांगली तरतूद केली आहे. भारतीय संविधान आपल्याला धार्मिक सहिष्णुता शिकविते. धर्म प्रसारित करण्याची आपल्या संविधानात तरतूदही आहे. कुणी व्यक्ती आपल्या धर्म प्रसाराचे काम करीत असेल तर आपण त्याला खंजीर मारत नाही. त्याची गरजही नाही. कारण आपल्या संविधानाने युक्तीवाद करण्याची मुभा आपल्याला दिली आहे. - अ‍ॅड. राम जेठमलानी

(यवतमाळ येथे २४ नोव्हेंबर २०१३ रोजी दिलेल्या व्याख्यानातील एक अंश)

टॅग्स :Yavatmalयवतमाळ