शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळची अपर्णा शुक्ला लखनौैच्या ‘सीआरसी’मध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 13:46 IST

जिद्द आणि परिश्रमाचा जोरावर यवतमाळ येथील अपर्णा रामकुमार शुक्ला हिने लखनौच्या (मध्य प्रदेश) केंद्रीय रिसर्च सेंटरमध्ये स्थान मिळविले आहे.

ठळक मुद्देदेशातून एकमेव वनस्पती शास्त्रात करणार संशोधन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिद्द आणि परिश्रमाचा जोरावर यवतमाळ येथील अपर्णा रामकुमार शुक्ला हिने लखनौच्या (मध्य प्रदेश) केंद्रीय रिसर्च सेंटरमध्ये स्थान मिळविले आहे. यासाठी निवड झालेली अपर्णा ही भारतातील एकमेव विद्यार्थिनी आहे. वनस्पतीशास्त्रात पीएच.डी. करताना ती ज्यूनिअर सायंटिस्ट म्हणून शोधकार्य करणार आहे.या रिसर्च सेंटरमध्ये निवडीसाठी जाहिरातीच्या माध्यमातून आॅनलाईन अर्ज मागविले जाते. दरवर्षी केवळ एका विद्यार्थ्याची पीएच.डी.साठी निवड होते. यावर्षी देशभरातून सुमारे एक हजार अर्ज दाखल झाले होते. यातून अपर्णा शुक्ला ही मानकरी ठरली आहे. ती चार वर्षात त्याठिकाणी निवासी राहून वनस्पतीशास्त्रात पीएच.डी. करणार आहे. यासाठी तिला संस्थेतर्फे शिष्यवृत्तीही मिळणार आहे. सेंटरच्या मंजूषा श्रीवास्तव यांचे तिला मार्गदर्शन लाभणार आहे.विविध प्रकारच्या वनस्पतींवर ती संशोधन करणार आहे. औषधांसाठी उपयोगात येणाऱ्या वनस्पतींचा ती या चार वर्षांच्या काळात अभ्यास करणार आहे. यवतमाळच्या अमोलकचंद महाविद्यालयातून बी.एससी. झाल्यानंतर तिने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून वनस्पतीशास्त्र विषयात एम.एससी. केले. सीएसआयआर-राष्ट्रीय वनस्पती अनुसंधान संस्थान लखनऊ येथे प्रवेश मिळवायचाच या जिद्दीने तिने तयारी सुरू केली. ७८ टक्केपेक्षा अधिक गुण घेत तिने या सेंटरमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न केले. यात तिला यशही मिळाले. या सेंटरमध्ये मिळालेला प्रवेश मोठी उपलब्धी मानली जाते. अपर्णाचे वडील रामकुमार शुक्ला हे एका खासगी बँकेत व्यवस्थापक, तर आई अंजू गृहिणी आहे. अमोलकचंद महाविद्यालयाचे प्राचार्य राममनोहर मिश्रा, प्रा. गुप्ता, प्रा. चुडीवाले तसेच अँग्लो हिंदी हायस्कूलचे माजी प्राचार्य राजेंद्रप्रसाद तिवारी यांच्या मार्गदर्शनात अपर्णाने ही भरारी घेतली आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र