शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळकरांनो, तुमचे पिण्याचे पाणी किती शुद्ध?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 05:00 IST

नागरिकांच्या घरापर्यंत शुद्ध पाणी पोहोचते आहे की नाही, यासाठी पाणीपुरवठा होत असलेल्या भागातून नियमितपणे पाण्याचे नमुने घेतले जात असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून सांगण्यात आले. फिल्टर प्लांटवरून टाकीपर्यंत पोहोचलेल्या पाण्याचीही तपासणी वेळोवेळी केली जाते. ज्या भागात पाणीपुरवठा सुरू आहे. त्या भागात कर्मचारी पोहोचून पाणी नमुने घेतात. याची तपासणी प्रयोगशाळेतून केली जाते. त्यांच्याकडून पाण्याविषयी साशंकता व्यक्त केल्यास आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातात, असे प्राधिकरणाचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देशहरात एकाच ठिकाणी हाेते पाण्याच्या नमुन्यांची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत यवतमाळ शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. पुरविले जाणारे पाणी शुद्ध असते, असा या विभागाचा दावा आहे. खरेच शुद्ध पाणी घरातील नळापर्यंत येते काय, हा प्रश्न निर्माण होतो. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातात. परंतु, अनेक ठिकाणी असलेले लिकेज, कर्मचाऱ्यांकडून कामे करताना होत असलेली दिरंगाई या व इतर कारणांमुळे काही भागात शुद्ध पाणी पोहोचण्याविषयी साशंकताच आहे. अगदी गटारांमधून पाईपलाईन गेलेल्या आहेत. काही ठिकाणी वाॅल्व्हमधून गटाराचे पाणी झिरपते आहे. तर काही ठिकाणी सम्पवरच आंघोळ करण्याचे प्रकार घडत आहेत. गाळयुक्त पाण्याची तर यवतमाळकरांना सवय झाली आहे. यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून होत असल्याचे सांगितले जाते.

प्रभागातून घेतले जातात पाण्याचे नमुनेनागरिकांच्या घरापर्यंत शुद्ध पाणी पोहोचते आहे की नाही, यासाठी पाणीपुरवठा होत असलेल्या भागातून नियमितपणे पाण्याचे नमुने घेतले जात असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून सांगण्यात आले. फिल्टर प्लांटवरून टाकीपर्यंत पोहोचलेल्या पाण्याचीही तपासणी वेळोवेळी केली जाते. ज्या भागात पाणीपुरवठा सुरू आहे. त्या भागात कर्मचारी पोहोचून पाणी नमुने घेतात. याची तपासणी प्रयोगशाळेतून केली जाते. त्यांच्याकडून पाण्याविषयी साशंकता व्यक्त केल्यास आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातात, असे प्राधिकरणाचे म्हणणे आहे.

अशी हाेते तपासणीयवतमाळ शहराला होणाऱ्या पाण्याचे शुद्धीकरण चापडोह आणि निळोणा फिल्टर प्लांटवरून होते. याठिकाणी दररोज पाच नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविले जातात.घेतलेले नमुने जिल्हा प्रयाेगशाळेकडे पाठविले जाते. तेथे इकोली बॅक्टेरिया आदी चाचण्या होतात. क्लोरिन तपासले जाते.

पिण्याच्या पाण्याची वेळोवेळी तपासणी केली जाते. जेणेकरून नागरिकांच्या घरापर्यंत शुद्ध पाणी पोहोचेल. पाणी पिण्यायोग्य नसल्याच्या तक्रारी झाल्यास तात्काळ नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविले जाते. शुद्ध पाणी मिळावे यासाठी खबरदारी घेण्यात येते.- अजय बेले, उपविभागीय अभियंता, मजीप्रा

 

टॅग्स :Waterपाणी