यवतमाळ शहराला दाट धुक्याने वेढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 20:40 IST2020-01-08T20:40:01+5:302020-01-08T20:40:07+5:30
जोरदार पावसाचा सामना करणाऱ्या यवतमाळ शहराला सायंकाळी दाट धुक्यांनी वेढले होते.

यवतमाळ शहराला दाट धुक्याने वेढले
यवतमाळ : बुधवारी सकाळपासून जोरदार पावसाचा सामना करणाऱ्या यवतमाळ शहराला सायंकाळी दाट धुक्यांनी वेढले होते. अगदी समोरचेही दिसेनासे झाल्याने वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. एरव्ही पहाटेच धुके असते. परंतु अचानक सायंकाळी हे धुके पडल्याने यवतमाळ शहरात तो कुतूहलाचा विषय ठरला होता. बुधवारी जिल्ह्याच्या महागाव व परिसरात गारपिटीचाही तडाखा बसला. दिवसभर उन्ह, पावसाचा खेळ सुरू होता. यवतमाळ ते धामणगाव रोडवर हे धुके सर्वाधिक जाणवत होते.