यवतमाळच्या लोणी येथे शेतकºयांचा चक्काजाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 13:48 IST2017-10-25T13:45:51+5:302017-10-25T13:48:33+5:30
आर्णी तालुक्यातील लोणी या गावात रात्रीच्या वेळी शेतात पाणी द्यायला गेलेल्या तरुण शेतकºयाचा मंगळवारी रात्री विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना येथे घडली.

यवतमाळच्या लोणी येथे शेतकºयांचा चक्काजाम
आॅनलाईन लोकमतयवतमाळ: आर्णी तालुक्यातील लोणी या गावात रात्रीच्या वेळी शेतात पाणी द्यायला गेलेल्या तरुण शेतकºयाचा मंगळवारी रात्री विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना येथे घडली. या घटनेने संतप्त झालेल्या शेतकरी व गावकºयांनी बुधवारी सकाळी दारव्हा-आर्णी मार्गावरील लोणी बसस्थानकावर चक्का जाम आंदोलन केले.
दिवसा भारनियमन असल्याने शेतकºयांना रात्रीच्या वेळी शेतात पाणी सोडावे लागते. शेताला पाणी देण्यासाठी गेले असताना शेतात लावलेल्या रोहित्रात प्रवाहित असलेल्या विजेचा धक्का लागून संतोष विष्णू होळकर (३०) हा तरुण शेतकरी मंगळवारी रात्री जागीच ठार झाला. ही बाब सकाळी उघडकीस आली तेव्हा शेतकरी व गावकºयांत संतापाची लाट उसळली. त्यांनी लोणी बसस्थानकासमोर टायर जाळून रास्ता रोको आंदोलन पुकारले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस तेथे दाखल झाले आहेत.