यवतमाळ जिल्ह्यात भाजपा कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 14:12 IST2018-12-14T14:11:27+5:302018-12-14T14:12:15+5:30
आर्णी येथील भाजपा कार्यकर्ता निलेश मस्के यांच्यावर आर्णी ग्रामीण रुग्णालयासमोर शुक्रवारी दुपारी १.३० वाजता लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला करण्यात आला.

यवतमाळ जिल्ह्यात भाजपा कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला
ठळक मुद्देनिलेश यांची प्रकृती चिंताजनक
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आर्णी येथील भाजपा कार्यकर्ता निलेश मस्के यांच्यावर आर्णी ग्रामीण रुग्णालयासमोर शुक्रवारी दुपारी १.३० वाजता लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. निलेश हा केळापूर-आर्णीचे भाजपा आमदार प्रा. राजू तोडसाम यांचा निकटवर्तीय कार्यकर्ता होता. हल्लेखोर संजय देठे हा तालुक्यातील म्हसोलाचा रहिवासी आहे. बुलेटवरून आलेला हल्लेखोर संजय हल्ल्यानंतर बुलेट जागीच टाकून पसार झाला. या घटनेने आर्णी येथे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. सविस्तर वृत्त लवकरच देत आहोत.