यवतमाळ जिल्ह्यातल्या मनदेव जंगलात पेटला वणवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 16:01 IST2018-03-29T16:00:59+5:302018-03-29T16:01:10+5:30
यवतमाळ जिल्ह्यातील हिवरी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या मनदेव जंगलात गुरुवारी वणवा पेटला. अख्खे जंगल जळत असल्याने पशुपक्षी सैरभैर झाले असून मौल्यवान सागवान धोक्यात आले आहे.

यवतमाळ जिल्ह्यातल्या मनदेव जंगलात पेटला वणवा
शिवानंद लोहिया
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील हिवरी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या मनदेव जंगलात गुरुवारी वणवा पेटला. अख्खे जंगल जळत असल्याने पशुपक्षी सैरभैर झाले असून मौल्यवान सागवान धोक्यात आले आहे.
यवतमाळ-आर्णी मार्गावर मनदेव जंगलात गत दोन दिवसांपासून वणवा पेटला आहे. गुरु वारी हवेचा वेग वाढल्याने या वणव्याची तीव्रता वाढली आहे. जंगलातील गवत पेटत असून यामुळे मोठ्या वृक्षांनाही आग लागत आहे. या जंगलात मौल्यवान सागवान आणि वनौषधी वृक्ष आहेत. ते आता धोक्यात आले आहे. तसेच बिबट, हरीण, रोही, रानडुक्कर आदी वन्यप्राणी आहे. तेही या वणव्यामुळे सैरभैर झाले आहेत. विशेष म्हणजे, तलावालगतच वणवा पेटला असल्याने या प्राण्यांना तलावावर पाणी पिण्यासाठीही जाता येत नाही. वन विभागाचा कोणताही कर्मचारी गुरु वारी दुपारपर्यंत या ठिकाणी पोहोचला नसल्याचे दिसत होते.