यवतमाळ जिल्ह्यात चिनी मांजा ठरत आहे पक्ष्यांसाठी कर्दनकाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 13:58 IST2020-11-10T13:56:41+5:302020-11-10T13:58:34+5:30
Wild life Yawatmal News यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथे एका पिंपळाच्या झाडावर एक घुबड चायनीज मांजामध्ये अडकल्याची माहिती वनविभागास मिळाली. वनरक्षक संतोष बदुकले यांनी युध्दस्तरावर प्रयत्न करून या मांज्यातून घुबडाची सुटका केली.

यवतमाळ जिल्ह्यात चिनी मांजा ठरत आहे पक्ष्यांसाठी कर्दनकाळ
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: पर्यावरणाचं रक्षण करण्याकरिता प्रत्येक जीवाचे अनन्यसाधारण महत्व आहे . परंतु चायनीज मांजा आता यांच्या जीवावर उठला आहे . चायनीज मांजा वापरण्यावर सरसकट बंदी आहे . पण याची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे . याचा फटका पक्ष्यांना बसत असुन या मांज्यात पक्ष्यांचे पंख अडकुन निरागस व निष्पाप पक्षांना आपले प्राण गमवावे लागत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथे एका पिंपळाच्या झाडावर एक घुबड चायनीज मांजामध्ये अडकल्याची माहिती वनविभागास मिळाली. कार्यरत वनरक्षक संतोष बदुकले यांनी युध्दस्तरावर प्रयत्न करून या मांज्यातून घुबडाची सुटका केली . यानंतर त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. त्यांनी केलेल्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे . सध्या पक्षी सप्ताह सुरु आहे . चायनीज मांजा न वापरण्याचे आवाहन पक्षी प्रेमींनी केले आहे .