शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
4
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
5
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
6
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
7
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
8
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
9
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
11
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
12
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
13
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
14
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
15
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
16
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
17
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
18
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
19
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
20
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समिती - व्यापाऱ्यांच्या दावणीला

By admin | Updated: February 26, 2015 02:05 IST

शासनाने शेतकऱ्यांच्या सोईसाठी सुरू केलेली यवतमाळची कृषी उत्पन्न बाजार समिती सध्या व्यापाऱ्यांच्या दावणीला बांधली आहे.

राजेश निस्ताने यवतमाळ शासनाने शेतकऱ्यांच्या सोईसाठी सुरू केलेली यवतमाळची कृषी उत्पन्न बाजार समिती सध्या व्यापाऱ्यांच्या दावणीला बांधली आहे. बाजार समितीवर संचालक मंडळ असताना जी स्थिती होती, त्यापेक्षाही वाईट अवस्था आता प्रशासक असताना निर्माण झाली आहे. यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची खुलेआम लूट सुरू आहे. सहकार विभागाचे अधिकारी या लुटीचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. या लुटीतील ‘वाटा’ त्यांना नक्कीच मिळत असावा, अशी खात्री त्यांची ‘धृतराष्ट्राची’ भूमिका पाहून कुणालाही होऊ शकते. या बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा कुणीच वाली नाही. तेथे एन्ट्री केल्यापासून तर बाहेर निघेपर्यंत ठिकठिकाणी शेतकऱ्यांचा मानसिक छळ, आर्थिक लूट होताना दिसते. ‘व्यापारी म्हणतील ती पूर्व दिशा’ असा कारभार सध्या तेथे सुरू आहे. व्यापारी, अडते आणि सहकार प्रशासनाच्या संगनमताने शेतकरी गंडविला जात आहे. घाम गाळून शेतकरी आपला माल विक्रीसाठी बाजार समितीत आणतो. मात्र हमी भावाच्या दीड ते दोन हजार रुपये कमी दरापासून मालाची बोली लावली जाते. नियमानुसार हमी भावाच्या पुढे बोली लागणे अपेक्षित आहे. मात्र व्यापारी सर्रास शेतकऱ्यांची लूटमार करीत असल्याचे चित्र मंगळवारी व बुधवारी अनुभवायला मिळाले. शेतकऱ्यांना तेथे बोलण्याची सोय नाही, त्याने नियमावर बोट ठेवल्यास थेट खरेदी बंद करू अशी धमकी व्यापारी देतात. फेरफटका मारला असता ही बाजार समितीत शेतकऱ्यांची की व्यापाऱ्यांची असा प्रश्न पडता. शेतकऱ्यांच्या मालाचा लिलाव चक्क बाजार समितीच्या कार्यालयासमोरच उघड्यावर होताना दिसून आला. वास्तविक हा लिलाव बाजार समितीच्या यार्डात होणे अपेक्षित आहे. परंतु यार्डात संपूर्ण व्यापाऱ्यांचा माल भरुन आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून हा माल सहकार प्रशासनाच्या मेहेरबानीमुळे तेथेच पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा माल ठेवण्यास जागाच नाही. शेतकरी मालासाठी यार्ड शोधताना दिसतात तर दुसरीकडे हे यार्ड खासगी कार्यक्रमासाठी दिले जात असल्याचा प्रकारही निदर्शनास आला.