Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 18:16 IST2025-10-31T18:15:58+5:302025-10-31T18:16:45+5:30
Yavatmal Wani-Chargaon Road Accident: कार शिकत असलेल्या तरूणीचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला.

Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
यवतमाळ: कार शिकत असलेल्या तरूणीचे वाहनावरील नियंत्रण सुटून झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चारजण ठार झाले. ही दुर्घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास वणी-चारगाव मार्गावरील लालगुडा गावालगत घडली. या अपघातात एक पाच वर्षीय चिमुरडी गंभीररित्या जखमी झाली आहे. रियाजुद्दीन रफिकउद्दीन शेख (वय, ५३), मायरा रियाजुद्दीन शेख (वय, १७), झोया रियाजुद्दीन शेख (वय, १३), अनिबा रियाजुद्दीन शेख (वय, ११) अशी मृतांची नावे आहेत.
या अपघातात मृत रियाजुद्दीन शेख यांच्या भावाची मुलगी इनाया शकीरूद्दीन शेख ही पाच वर्षीय चिमुरडी गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले . गॅरेज व्यावसायिक असलेल्या रियाजुद्दीन शेख यांची मोठी मुलगी मायरा ही कार चालविणे शिकत होती. मात्र, रस्त्याच्या एका वळणावर वाहनावरून तिचे नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्ता दुभाजकावर चढून दुसऱ्या बाजुला गेली. याचवेळी समोरून येणाऱ्या हायवा ट्रकची या कारला जबर धडक बसली.