शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

ऊसतोड कामगार निघाले कारखान्याकडे

By admin | Updated: November 6, 2016 00:25 IST

साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होत असल्याने तालुक्याच्या ग्रामीण भागातून ऊस तोडणीसाठी हजारो कामगार रवाना होत आहेत.

गाव, वाड्या, तांडे ओस : ४० हजारांवर मजूर रवाना पुसद : साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होत असल्याने तालुक्याच्या ग्रामीण भागातून ऊस तोडणीसाठी हजारो कामगार रवाना होत आहेत. दिवाळीनंतर तांडे, वाड्या, वस्त्यांत कारखान्याला जाण्यासाठी मजुरांची लगबग झाली असून मजुरांना निरोप देण्यासाठी कुटुंब रस्त्यावर थांबलेले दिसतात. आतापर्यंत हजारो मजूर ऊस तोडणीसाठी गेल्याने तालुक्यातील तांडे-वाडे ओस पडली आहे.यावर्षी काही भागात चांगला पाऊस झाला तर काही भागात कमी पाऊस झाल्याने शेती व्यवसायही संकटात आला आहे. त्यामुळे कुटुंबासह ऊसतोड मजूर महाराष्ट्रासह इतर राज्यात स्थलांतर करीत असल्याचे दिसत आहे. शेकडो मजूर स्थलांतर झाल्याने या ऊसतोड कामगारांच्या पाल्याचे शिक्षणही बुडण्याची शक्यता आहे. पुसद तालुक्यात अनेक गावाहून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, गुजरात, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, कर्नाटक अशा ठिकाणी कामाला जात आहेत. चार ते पाच महिने पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोड कामगारांना आपल्या कुटुंबासह जातात. ऊसतोड मजुरांचे आठ ते पंधरा दिवसात या गावाहून त्या गावाला कामगारांचा टोळ्याचे स्थलांतर होत असल्याने तसेच अनेक ठिकाणी शाळांची सोय नसल्याने ऊसतोड कामगारांच्या पाल्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. ट्रक, ट्रॅक्टर तालुक्यातील वाड्या व रस्त्यांवर हजर होतात. मजुरांच्या स्थलांतरामुळे बाजारपेठेवर परिणाम जाणवणार आहे. परंपरागत असलेल्या ऊसतोडीचा धंदा थांबता थांबत नाही. बारमाही बायागतीचा तालुक्यात अभाव असल्याने मजूर दरवर्षी बाहेर जात आहे. स्थलांतरित मजुरांचा आकडा समोर आला नसला तरी दरवर्षीप्रमाणे यंदाही तालुक्यातून ४० हजाराच्यावर ऊसतोड मजुरांचे स्थलांतर होणार असल्याचे बोलले जात आहे. (तालुका प्रतिनिधी)स्थानिक कापूस उत्पादकांची होणार कोंडीतालुक्यातील बहुतांश शेतमजूर ऊस तोडणीसाठी बाहेर जिल्ह्यात जात आहेत. चांगल्या रोजगाराच्या शोधात दरवर्षी मजुरांचे कुटुंबच्या कुटुंब स्थालांतरित होते. परंतु, या स्थलांतरामुळे तालुक्यातील स्थानिक शेतकऱ्यांची मोठी कोंडी होते. तालुक्यात उसाप्रमाणेच कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. सध्या कापूस वेचणीचे काम सुरू आहे. मात्र तालुक्यातील मजूर मोठ्या प्रमाणात बाहेर जात असल्याने स्थानिक शेतकऱ्यांची अडचण झाली आहे.