शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
IPL 2026 : अभिषेक-हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
5
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
6
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
7
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
8
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
9
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
10
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
11
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
12
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
13
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
15
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
16
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
17
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
18
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
19
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
20
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाग्रस्तांच्या अंत्यविधीसाठी मजुरांनी दिली ट्रॅक्टरभर लाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:00 IST

तो गावात पोहोचला अन् त्याने आपल्या सर्व मजूर मित्रांना यवतमाळातील परिस्थिती सांगितली. यवतमाळात कोरोनाने दररोज माणसे मरत आहेत, त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नगरपालिकेला लाकडेही मिळणे कठीण झाले आहे... हे ऐकून वरुड गावातील मजूर सरसावले. गावकऱ्यांनीही त्यांना साथ दिली. ज्यांच्या घरी लाकडे होती, ती त्यांनी काढून दिली. काही जणांनी शेतातून तर काहींनी आजूबाजूच्या जंगलातून जळाऊ लाकडे गोळा केली.

ठळक मुद्देवरुडवासीयांची दानत : यवतमाळातील परिस्थिती पाहून खेड्यांचे हृदय द्रवले

अविनाश साबापुरेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना झाला असे कळताच सख्खा भाऊही भावाला हात लावायला तयार नाही. पण खेड्यातल्या दिलदार माणसांनी आजही कोरोनाच्या भयापेक्षा माणुसकीचे नातेच मोठे मानले आहे. यवतमाळात कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडांची कमतरता भासतेय. ही वार्ता कळताच खेड्यातल्या मजुरांनी जंगल पालथे घालून ट्रॅक्टरभर इंधन गोळा केले अन् दिले पाठवून यवतमाळला. लाॅकडाऊनमध्ये ज्यांच्या उदरनिर्वाहाची काळजी करायला कोणी तयार नाही, ते मजूर मात्र अजूनही समाजाचे ऋण फेडण्यासाठी पोटाला चिमटा घेऊन राबायला तयार आहेत.हे दिलदार मजूर आहेत यवतमाळ तालुक्यातील वरुड या गावचे. झाले असे की, वरुड गावच्या एका तरुणाचा यवतमाळातील दोस्त चार दिवसांपूर्वी कोरोनाने दगावला. कोरोना मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांना फारशी परवानगी नसली, तरी हा मित्र स्मशानभूमीत पोहोचला. दुरूनच त्याने अंत्यदर्शन घेतले. पण एकाच दिवशी खूप अंत्यविधी असल्याने स्मशानभूमीत लाकडांची टंचाई असल्याचे त्याला जाणवले. तो गावात पोहोचला अन् त्याने आपल्या सर्व मजूर मित्रांना यवतमाळातील परिस्थिती सांगितली. यवतमाळात कोरोनाने दररोज माणसे मरत आहेत, त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नगरपालिकेला लाकडेही मिळणे कठीण झाले आहे... हे ऐकून वरुड गावातील मजूर सरसावले. गावकऱ्यांनीही त्यांना साथ दिली. ज्यांच्या घरी लाकडे होती, ती त्यांनी काढून दिली. काही जणांनी शेतातून तर काहींनी आजूबाजूच्या जंगलातून जळाऊ लाकडे गोळा केली. चार दिवस खपल्यावर एका ट्रॅक्टरची भरती झाली. तेव्हा साऱ्यांना समाधान वाटले. मंगळवारी सकाळीच हा ट्रॅक्टर घेऊन वरुड येथील गावकरी यवतमाळात धडकले. राजन भुरे, मंगेश बादुरकार, रमेश बोबडे, बडू कुंभारे, भगवान घागी, मंगेश बोबडे, रमेश काकडे, श्रावण मडपाचे, रामाजी मनपाचे, यश भुरे, बादल टेकाम, वश भुरे, लक्ष्मण मनपाचे, सतीश टेकाम हे सारेच ट्रॅक्टरसोबत थेट स्मशानभूमीत पोहोचले आणि स्वत:च लाकडे उतरवून दिली. कुणाशी बोलून श्रेय लाटण्याचा प्रयत्न न करता हे सर्व जण आल्यापावली गावाकडे निघून गेले. मात्र जाताना शहराला मदत देऊन गेले. 

शहराने मानले खेड्याचे आभार !यवतमाळात लाकडांची टंचाई झाल्याने कोरोना मृतांचा अंत्यविधीही संकटात सापडला होता. मात्र वरुडसारख्या खेड्यातील मजुरांनी लाकडे आणून दिल्याने हातभार लागला. असेच दान इतरही खेड्यांतील लोकांनी केले, तर इंधन टंचाईचा प्रश्न कायमचा मिटेल, अशी भावना वरुड येथील राजन भुरे यांनी व्यक्त केली. तर यवतमाळ पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. विजय अग्रवाल यांनी या दानाकरिता वरुडवासीयांचे आभार मानले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या