शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

महिला कारभारणींनी जागविले खेडे!

By admin | Updated: March 8, 2017 00:10 IST

शिक्षणाची कास धरून अख्खे गाव समृद्ध करण्यासाठी गावाच्या कारभाराची सारी सूत्रे महिलांनी हाती घेतली आहेत.

हिवरधरा येथे साऱ्याच कारभारणी : गावाच्या भल्यासाठी सावित्रीचा आदर्श विठ्ठल कांबळे   घाटंजी शिक्षणाची कास धरून अख्खे गाव समृद्ध करण्यासाठी गावाच्या कारभाराची सारी सूत्रे महिलांनी हाती घेतली आहेत. हे गाव आहे तालुक्यातील हिवरधरा. सरपंचापासून ग्रामसेविकेपर्यंत येथे साऱ्या महिलाच. गाव प्रगतीच्या वाटेवर आणण्यासाठी त्या काय करतात? शाहू, फुले, आंबेडकरांच्या तत्त्वांचा विचार करतात अन् छत्रपती शिवरायांच्या धडाडीने प्रत्यक्ष काम करतात. खेडे जागविणाऱ्या ‘सावित्रीं’ची ही कहाणी खास महिला दिनानिमित्त... तालुक्यातील हिवरधरा हे एक नव्या विचारांचे गाव. तालुक्यापासून १२ किलोमीटर अंतरावर डोंगरदऱ्यात विसावलेले हे ७०० लोकवस्तीचे गाव. या गावाचा संपूर्ण कारभार महिला सक्षमपणे पाहात आहेत. गावच्या सरपंच समिधा अरुण खडसे, तर पोलीस पाटील अर्चना अनिल गावंडे आहेत. ग्रामसेविका याही ताई मिसाळ आहेत. शाळा समितीच्या अध्यक्ष गीता बंडू आत्राम, जिल्हा परिषद शिक्षिका संगीता प्रभाकर चव्हाण, आरोग्यसेविका ताई चव्हाण, अंगणवाडी शिक्षिका ज्योत्स्ना परशराम मरस्कोल्हे या आहेत. म्हणजेच पदाधिकारी तसेच गाव आणि शासनाचा दुवा असणारे कर्मचारीही महिलाच आहेत. त्यामुळे या गावाची सत्ता आणि कारभाराची सूत्रे महिलांच्या हाती आहेत. या छोट्याशा गावात सर्व धर्माचे लोक आनंदाने व गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. सुख-दु:खात धावून जातात. कोणतेही उपक्रम गावकरी मिळून साजरा करतात. या गावाच्या कारभारणी ज्ञान आणि विकासावर भर देतात. त्यासाठी त्यांनी मकरसंक्रांतीच्या परंपरेला फाटा देत ज्ञानाच्या प्रसारासाठी गावात ग्रंथदिंडी काढली. वाणाऐवजी २०० ‘ग्रामगीता’ वाटप केल्या. शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले. गावाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी त्या विविध उपक्रम राबवितात. बचतगटाच्या माध्यमातून त्यांनी गावातील महिलांना मुलांच्या शिक्षणासाठी जागृत केले. गावात शैक्षणिक वातावरण निर्मिती, स्वच्छतेचा ध्यास छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचा वसा घेत सावित्रीबाई फुलेंच्या आदर्शावर पाऊल टाकत या महिला काम करीत आहे. गावात शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासोबतच गावात शौचालय बांधून गाव स्वच्छ व सुंदर बनविण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे. बळीराजा चेतना अभियानांतर्गत गावात जनजागृती करून मतदार नोंदणी, बचत गट आदी शासनाच्या विविध उपक्रमात त्यांचा सहभाग असतो.