शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
4
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
5
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
6
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
7
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
8
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
9
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
10
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

महिलेचा मृतदेह ३६ तास अंत्यविधीसाठी ताटकळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 05:00 IST

माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना तालुक्यातील शिंगणापूर गावात रविवारी घडली. शिंगणापूर येथे शनिवारी सायंकाळी जिजा अरुण राऊत यांचे निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्यांनी मृत्यूपर्वी दोनदा आरटीपीसीआर तपासणी केली. या तपासणीमध्ये त्या कोरोना निगेटिव्ह आल्या; परंतु उपचरादरम्यान त्या घरीच मृत्यू पावल्या. गावकऱ्यांनी मात्र ही महिला कोरोनाबाधित असल्याची धारणा करून घेतली होती.

ठळक मुद्देगावकऱ्यांमध्ये काेरोनाची धास्ती : खांदा द्यायलाही कुणी येईना, अखेर प्रशासनाचा हस्तक्षेप

गजानन अक्कलवार लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : कोरोना आणखी किती वाईट दिवस दाखविणार कुणास ठाऊक? कोरोनाची भीती इतकी वाढली आहे की, साध्या आजाराने दगावलेल्या व्यक्तीच्याही अंत्यसंस्काराला लोक घाबरू लागले आहेत. याच अनाठायी भीतीमुळे रविवारी एका महिलेचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी ३६ तास ताटकळत राहिला. तिरडीला खांदा देण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. शेवटी प्रशासनाने हस्तक्षेप करून या महिलेला अखेरचा निरोप दिला.माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना तालुक्यातील शिंगणापूर गावात रविवारी घडली. शिंगणापूर येथे शनिवारी सायंकाळी जिजा अरुण राऊत यांचे निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्यांनी मृत्यूपर्वी दोनदा आरटीपीसीआर तपासणी केली. या तपासणीमध्ये त्या कोरोना निगेटिव्ह आल्या; परंतु उपचरादरम्यान त्या घरीच मृत्यू पावल्या. गावकऱ्यांनी मात्र ही महिला कोरोनाबाधित असल्याची धारणा करून घेतली होती. विशेष म्हणजे जिजा ज्या दिवशी मृत्यू पावल्या, त्याच दिवशी त्यांचे पती अरुण राऊत हे कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिजा राऊत यांच्या अंत्यसंस्कारासाठी गावातील कोणीही पुढे यायला तयार नव्हते. अंत्यसंस्काराचा पेचप्रसंग निर्माण झाल्याची माहिती तहसीलदार डॉ. सुनील चव्हाण, बीडीओ पद्माकर मडावी, टीएचओ डॉ. विजय आकोलकर यांना देण्यात आली. त्यांनी लगेच शासकीय यंत्रणेला कामी लावले. यासाठी ग्राम दक्षता समितीला सक्रिय करण्यात आले. शेवटी गावकऱ्यांशी संवाद साधून या प्रकरणावर तोडगा काढण्यात आला. गावकऱ्यांची समजूत काढण्यात सरंपच किरण येरमे, तलाठी पी. डी. तिरळे, ग्रामसेवक सुजित थुल, पोलीस पाटील गजेंद्र झोड, आशा स्वयंसेविका ताई वड्डे यांना यश मिळाले. 

कीट घालून अंत्यसंस्कार  पीपीई कीट घालून अंत्यसंस्कार केले जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर गावकरी अंत्यसंस्कारासाठी राजी झाले. अखेर मृत आत्म्याला खांदेकऱ्यांची असलेली प्रतीक्षा संपली. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू