शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेच्या कर्जदारांनाच लाभ मिळणार काय ? नियमांबाबत शेतकरी संभ्रमावस्थेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 17:34 IST

Yavatmal : आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी शेतकरी कर्ज निवारण योजना लागू केली जाणार आहे. या दृष्टीने जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कर्जदार शेतकऱ्यांची माहिती घेतली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी शेतकरी कर्ज निवारण योजना लागू केली जाणार आहे. या दृष्टीने जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कर्जदार शेतकऱ्यांची माहिती घेतली जात आहे. याचवेळी राष्ट्रीयीकृत बँकांकडील शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची कुठलीच माहिती अद्याप गोळा झालेली नाही. यामुळे शेतकरी कर्ज निवारण योजना लागू झाली, तर त्याचा लाभ जिल्हा बँकेच्याच कर्जदार शेतकऱ्यांना मिळणार काय, असा प्रश्न आता विचारला जात आहे. यातून राष्ट्रीयीकृत बँकांमधील शेतकरी संभ्रमात सापडले आहेत.

कर्ज वितरण करण्यात जिल्हा मध्यवर्ती बँका असमर्थ असल्याने कर्ज वितरणाची जबाबदारी १९ राष्ट्रीयीकृत बँकातर बँका आणि व्यापारी सोपविण्यात आली आहे. या बँकेतून कर्ज उचलणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. यातील थकबाकीदार शेतकऱ्यांचा आकडा मोठा आहे. यानंतरही राष्ट्रीयीकृत बँकांमधून शेतकरी कर्ज निवारणाची मोहीम राबविली जात नसल्याने शेतकरी संभ्रमात सापडले आहेत.

बँकांमध्ये येरझारा वाढल्या

जिल्हा मध्यवर्ती बँकेतील थकीत कर्जदार शेतकऱ्यांचा डाटा मागविला जात आहे. यात आधार, बैंक पासबुक मागविण्यात आले आहे. यामुळे राष्ट्रीयीकृत बँकांचे शेतकरी राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये पोहोचत आहे. बँकांकडून त्यांना कुठल्याही सूचना नसल्याचे सांगितले जात आहे.

सव्वा लाख शेतकऱ्यांवर ९१७ कोटींचे कर्ज

यवतमाळ जिल्ह्यातील १९ राष्ट्रीयीकृत आणि व्यापारी बँकांकडील एक लाख ३२ हजार शेतकऱ्यांकडे २१७ कोटी रुपयांचे कर्ज थकले आहे. यात अल्प व मध्यम मुदतीच्या कर्जाचा समावेश आहे. कर्ज निवारण योजनेत या शेतकऱ्यांना समाविष्ट केले तर त्याचा लाभ संकटातील शेतकऱ्यांना होणार आहे.

शेतकऱ्यांना आदेशाची प्रतीक्षा

राष्ट्रीयीकृत बँकांची सर्व माहिती ऑनलाइन आहे. यामुळे ही योजना राबविताना माहिती लागली तरी ती ऑनलाइन् उपलब्ध होणार आहे. मात्र, याची अंमलबजावणी होणार किंवा नाही याची माहिती तूर्त जिल्हा पातळीवर नाही.

"आमच्याकडे कर्जमाफीच्या अनुषंगाने कुठलीही माहिती आली नाही. जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून जशी माहिती गोळा होत आहे तशी माहिती गोळा करण्याच्या सूचना नाही. आमचा संपूर्ण रेकॉर्ड ऑनलाइन उपलब्ध आहे."- ज्ञानेश्वर टापरे, अग्रणी बँक व्यवस्थापक

English
हिंदी सारांश
Web Title : Loan waiver benefits only for district bank borrowers? Farmers in confusion.

Web Summary : Farmers are confused whether loan waiver scheme will benefit only district bank borrowers. Nationalized banks are yet to collect farmer loan details. This disparity creates uncertainty among nationalized bank borrowers regarding scheme benefits.
टॅग्स :FarmerशेतकरीYavatmalयवतमाळ