शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी केंद्रांच्या निकालाला विलंब का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 05:00 IST

सोयाबीन बियाणे विक्रीतील एकूणच घोळ ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणला होता. जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण केली गेली होती. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे बियाणे कोपरगाव-शिर्डीपर्यंत नेऊन जादा दराने विकले गेले होते. इकडे शेतकºयांना कंपन्यांकडून बियाणे आलेच नाही असे सांगितले जात होते. तर काहींना हेच बियाणे जादा दराने विकले गेले. कृषी विभागाने अशा आठ गोदामांची तपासणी केली होती.

ठळक मुद्देठोक सोयाबीन विक्रेते : जादा दराने विक्री, कृषी विभागाची भूमिका संशयास्पद

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : खरीप हंगाम काळात यवतमाळातील ठोक बियाणे विक्रेत्यांनी सोयाबीन बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण करून जादा दरात विक्री करीत शेतकऱ्यांची फसवणूक केली. या प्रकरणात या विक्रेत्यांना नोटीस बजावून सुनावणी पूर्ण झाली. मात्र त्यावरील निर्णय देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने संबंधित कृषी प्रशासनाकडे साशंकतेने पाहिले जात आहे.सोयाबीन बियाणे विक्रीतील एकूणच घोळ ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणला होता. जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण केली गेली होती. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे बियाणे कोपरगाव-शिर्डीपर्यंत नेऊन जादा दराने विकले गेले होते. इकडे शेतकºयांना कंपन्यांकडून बियाणे आलेच नाही असे सांगितले जात होते. तर काहींना हेच बियाणे जादा दराने विकले गेले. कृषी विभागाने अशा आठ गोदामांची तपासणी केली होती. तेथे साठेबाजी व काही गैरप्रकार आढळून आले. त्यामुळे यवतमाळातील चार ते पाच ठोक विक्रेत्यांना कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण पथकाने नोटीस बजावली होती. त्यामध्ये दिलीप बोगावार यांचे कृषी प्रगती, संजय कोषटवार यांचे सुदर्शन कृषी केंद्र, राम जाजू यांचे जाजू कृषी केंद्र आणि ओमप्रकाश गुप्ता यांच्या कृषी कल्पतरू या बियाणे विक्री प्रतिष्ठानांचा समावेश आहे.नियंत्रण पथकाचे अधिकारी ‘संपर्का’बाहेरनोटीसच्या अनुषंगाने विक्रेत्यांना समक्ष बोलावून व त्यांची बाजू ऐकून घेऊन सुनावणी घेण्यात आली. ही सुनावणी होऊन अनेक दिवस लोटले. मात्र अद्याप त्यावर निर्णय दिला गेलेला नाही. या निर्णयास विलंब का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यात कुठे पाणी तर मुरत नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी नियंत्रण पथकाच्या अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क करूनही प्रतिसाद मिळाला नाही. निकालाला विलंब होत असल्याने कृषी प्रशासनाकडे साशंकतेने पाहिले जात आहे. सर्व काही पारदर्शक असेल तर लगेच निकाल व कारवाई का नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कुठे तडजोड झाली असेल तर ही कारवाई दडपली जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

टॅग्स :agricultureशेती