जंगल पेटवणार तो कोठडीत जाणार ! दरवर्षी आगीमुळे नष्ट होते जंगल क्षेत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 18:23 IST2025-02-21T18:23:10+5:302025-02-21T18:23:43+5:30
वणव्यामुळे वनसंपदा होते खाक : उन्हाळ्यात धोका

Whoever sets the forest on fire will go to jail! Every year, forest area is destroyed due to fire.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : उन्हाळ्यात तापमान वाढून जंगलात वणवे पेटण्याची शक्यता जास्त असते. तसेच अनेक वाटसरू जंगलाच्या दिशेने जळती विडीदेखील फेकून देतात. अनेकदा हीच जळती विडी क्षणात संपूर्ण जंगलाला कवेत घेते. त्यामुळे वनक्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी सापडते. हा प्रकार वनविभागाच्या निदर्शनास आल्यास अशा दोषींना वन कोठडीची हवा खावी लागणार आहे.
उन्हाळ्याची चाहूल लागताच पानगळती सुरू होते. त्यामुळे जंगलात मोठ्या प्रमाणात पालापाचोळा जमा होतो. उन्हाळ्यात तापमानात वाढ होत असते. या वाढत्या तापमानामुळे वणवे पेटण्याची शक्यता असते. त्यामुळे वनविभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येतात. दरवर्षी वनविभाग वणव्यापासून जंगलाला वाचवण्यासाठी खबरदारी घेतात. त्यासाठी जाळरेषा तयार केल्या जातात. कृत्रिम वणव्याच्या घटनाही उन्हाळ्यात अधिक घडतात. त्याला धूम्रपान करणारे नागरिक जबाबदार असतात.
आपल्या एका चुकीमुळे संपूर्ण जंगल जळून खाक होईल, याचेही भान त्यांना नसते. तसेच या प्रकारामुळे वन कोठडीत जाण्याची वेळ येऊ शकते, हेदेखील अनेकांना माहिती नाही. अनेक जंगलात बिबट, वाघ, रोही, हरीण, रानडुक्कर, मोर आदी पशुपक्ष्यांचे वास्तव्य आहे. आगीच्या घटनेत वन्यप्राणीही अनेकदा होरपळले जातात.
२ वर्षे कारावासाची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे जंगलात आग लावणाऱ्यांना या कायद्यानुसार दोन वर्षाची शिक्षा होवू शकते.
वनक्षेत्र का महत्त्वाचे ?
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वनक्षेत्र अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळेच शासनाच्या वनविभागासह सामाजिक वनीकरणकडून दरवर्षी पावसाळ्यात वृक्ष लागवड मोहीम राबवली जाते. त्यामुळे वनक्षेत्राचे रक्षण आणि संवर्धन करणे गरजेचे आहे.
वन्यप्राणीदेखील होरपळतात
जंगलात वणवा पेटल्यानंतर वन्यप्राण्यांचीही पळापळ होते. वनसंपदेसोबतच वन्यप्राणीदेखील होरपळून जातात. जंगलात वणवा पेटविल्याने वनसंपदेसोबतच पशुपक्ष्यांची हानी होईल, याची जाणीव आग लावणाऱ्यांना नसते.
जाळरेषा यासाठी महत्त्वाची
उन्हाळ्यात तापमानात वाढ होत असते. या वाढत्या तापमानामुळे वणवे पेटण्याची शक्यता असते. त्यामुळे वन विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येतात. वणवे रोखण्यात जाळरेषा महत्त्वाच्या असतात. त्यामुळे रस्त्याच्या कडेला जे वनक्षेत्र आहे, त्या वनक्षेत्रात साधारण ८०० किलोमीटरची जाळरेषा (फायर लाइन) घेण्यात आली आहे. उन्हाळा सुरू होण्यापूर्वीपासूनच उपाययोजना म्हणून जाळरेषा घेण्यास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर ठिकठिकाणी निरीक्षक नियुक्त केले जातात.
जंगलाला आग लागण्याची प्रमुख कारणे
उन्हाळ्यात दरवर्षी जंगलात आग लागून वनसंपदा नष्ट होत असल्याच्या घटना घडत आहे. रस्त्याने जाणारे अनेक जण जळती विडी फेकून देतात. तापमानाचा पारा चढलेला असल्यामुळे हीच जळती विडी अख्खे जंगल जाळण्यास कारणीभूत ठरते. जिल्ह्यात बहुतांश जंगलांना शेतजमिनी लागून आहे. उन्हाळ्यात पीक काढल्यानंतर कचरा गोळा करून पेटविला जातो. अनेकदा हीच आग जंगलाला खाक करण्याचे कारण ठरते. वनविभागाकडून जंगलाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी नेहमीच उपाययोजना केल्या जातात. मात्र काही जण जाणीवपूर्वक जंगलाला आग लावतात. अशा दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी कायदा अस्तित्वात आहे. जंगलात वणवा लावणाऱ्यास दोन वर्षांची शिक्षा होऊ शकते.
वनक्षेत्र का महत्त्वाचे ?
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वनक्षेत्र अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळेच शासनाच्या वनविभागासह सामाजिक वनीकरणकडून दरवर्षी पावसाळ्यात वृक्ष लागवड मोहीम राबवली जाते. त्यामुळे वनक्षेत्राचे रक्षण आणि संवर्धन करणे गरजेचे आहे.