शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

दारव्हा येथील पाण्याची टाकी ठरली पांढरा हत्ती

By admin | Updated: May 13, 2016 02:42 IST

शहरातील आठवडीबाजार परिसरात लाखो रुपये खर्च करून पाण्याची टाकी बांधण्यात आली.

लाखो रुपये वाया : अनेक भागात पाणी पोहोचतच नाहीदारव्हा : शहरातील आठवडीबाजार परिसरात लाखो रुपये खर्च करून पाण्याची टाकी बांधण्यात आली. परंतु या टाकीवरून अनेक भागात पाणीच पोहचत नसल्याने ही टाकी पांढरा हत्ती ठरल्याचे दिसून येत आहे.सन २०११ मध्ये तब्बल ५४ लाख रुपये खर्च करून तीन लाख लिटर क्षमतेची पाणी टाकी बांधकाम, ऊर्ध्व वाहिनी व वितरण व्यवस्थेची कामे करण्यात आली. मात्र तरीसुद्धा या परिसरातील रहिवाशांची तहान भागू शकली नाही. पूर्वीच्या वॉर्ड क्रमांक आठ या दलीत वस्ती वॉर्डातील नागरिकांना व्यवस्थित पाणीपुरवठा होत नसल्यामुळे तेथील रहिवाशांचे प्रचंड हाल होत होते. त्यामुळे या भागातील नागरिकांच्या सोयीकरिता पाणी टाकी व वितरण व्यवस्थेची कामे मंजूर करण्यात आली. २००९ मध्ये तांत्रिक मान्यता व २०१० मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर टाकीचे बांधकाम करण्यात आले. टाकीचे बांधकाम झाल्यानंतर ऊर्ध्व वाहिनीचे काम करण्यात आले. १५० मिमी व १०० मिमी व्यासाची पाईपलाईन टाकण्यात आली. त्यानंतर डिसेंबर २०१२ पासून या योजनेवरून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. एकूण ५३ लाख ६६ हजार रुपये खर्च करण्यात आल्याचे सांगण्यात आले.याच टाकीवरून खाटीकपुरा परिसरात पाणीपुरवठा करण्याकरिता वाढीव काम करण्यात आले. परंतु त्याचा उपयोग झाला नाही. खर्च करूनसुद्धा त्या भागात पाणी पोहोचत नाही. त्याचबरोबर ज्या भागाकरिता लाखो रुपये खर्च करून टाकी बांधली, त्या वसाहतीमध्येसुद्धा व्यवस्थित पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी या परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहेत. या तक्रारींची त्वरित दखल घेऊन पाणीपुरवठ सुरळीत करण्याची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)कंत्राटदाराचे बिल काढू नकावाढीव काम केल्यानंतर नागरिकांना पाणी मिळत नसल्याने कामात दुरुस्ती झाल्याशिवाय संबंधित कंत्राटदाराचे बिल काढण्यात येवू नये, अशी मागणी मंगळवारला झालेल्या नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी केली. या विषयावर चर्चा झाल्यानंतर तसा निर्णय घेण्यात आला.