शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूशी झुंज देताना आयुषची ज्योत विझली

By admin | Updated: May 24, 2014 23:56 IST

आयुषच्या दीर्घायुष्यासाठी मदत म्हणून अनेकांनी आपला वाढदिवस रद्द केला. त्याच्यासाठी अनेकांनी खारीचा वाटा उचलला. एवढेच नव्हेतर त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थनाही केल्यात.

नियतीची मात : अनेकांच्या डोळ्यात अश्रू

यवतमाळ : आयुषच्या दीर्घायुष्यासाठी मदत म्हणून अनेकांनी आपला वाढदिवस रद्द केला. त्याच्यासाठी अनेकांनी खारीचा वाटा उचलला. एवढेच नव्हेतर त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थनाही केल्यात. मात्र नियतीपुढे सर्वच थिटे पडले. कॅन्सरने ग्रस्त आयुषने मृत्यूशी झुंज देत मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्‍वास घेतला.

यवतमाळचा आयुष धमेंद्र तोटे हा बारा वर्षीय बालक. चॉकलेटसाठी हट्ट धरण्याच्या वयात त्याला रक्ताच्या कर्करोगाने ग्रासले. घरात अठराविश्‍व दारिद्रय़. उपचार कसे करायचे, असा प्रश्न त्याच्या जन्मदात्यांपुढे उभा राहिला. महागडे उपचार कसे करायचे, ही विवंचना सतावू लागली. ‘लोकमत’ला त्याची ही करुण कहानी माहीत झाली. सामाजिक बांधिलकीत अग्रेसर असलेल्या ‘लोकमत’ने आयुषसाठी मदतीचा हात पुढे केला. समाजातील संवेदनशील मनाला मदतीचे आवाहन केले. आयुषची ही कहानी वाचून अनेकांच्या हृदयात चर्र झाले. आयुषसाठी अनेकांनी मदतीचे हात पुढे केले. कुणी तर चक्क आपला वाढदिवस रद्द करून आर्थिक मदत केली. उपचारासाठी आवश्यक पैसा समाजातील विविध घटकातून उभा झाला. या पैशातून आयुषचे आयुष्य वाढावे म्हणून कुटुंबीयांची धडपड सुरू झाली. त्याला मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनीही प्रयत्नांची पराकाष्ठा केली. कुटुंबीयांच्या आशा पल्लवीत झाल्या. इकडे मदतीचा ओघ सुरूच होता. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. उपचारादरम्यान आयुषला निमोनिया झाला. यातूनही आयुष बरा होऊ लागला. आयसीयूमध्ये उपचार सुरू असताना त्याला रक्तपुरवठा करणे सुरू केले.

मात्र डॉक्टरांचे प्रयत्न सुरू असतानाच आयुषच्या मेंदूने काम करणे बंद केले. जगण्याची दुर्दम्य आकांक्षा मनाशी बाळगली असताना नियतीच्या मनात मात्र वेगळेच सुरू होते. एका क्षणात कोवळी कळी कुस्करल्या गेली. आयुषच्या मृत्यूची बातमी ऐकताच त्याच्या आईने टाटा हॉस्पिटलमध्येच हंबरडा फोडला. काळीज चिरून टाकणारा टाहो पाहून रुग्णालयातील अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला.

यवतमाळात आयुषच्या मृत्यूची वार्ता धडकली. अनेकांच्या हृदयात कालवाकालव झाली. हसते-खेळते फूल नियतीने अशा रितीने खुडून न्यावे, याचे दु:ख चेहर्‍यावर दिसत होते. जिल्हाभरातून मदतीचा ओघ सुरू होता. प्रत्येकजण आपल्या परीने मदत देवून त्याच्या दीर्घायुष्यासाठी मनोमन प्रार्थना करीत होते.

ज्यांनी आयुषला कधी पाहिलेही नाही. मात्र मदतीसाठी हात पुढे करणार्‍यांच्या काळीजही चर्र झाले. एका गरीब कुटुंबातील बालकाला जीवदान देण्यासाठी चालविलेली ही धडपड नियतीने एका क्षणात थांबविली. नियतीसमोर सगळ्यांनाच पराभूत व्हावे लागले. जगण्याच्या आकांक्षेवर नियतीने निर्दयी मात केली. (शहर प्रतिनिधी)