शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

‘कोई जब राह न पाये, मेरे संग आये’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 06:00 IST

येथील काव्य वाचन आणि गायनाच्या कार्यक्रमासाठी हे दृष्टीहीन विद्यार्थी आले होते. निळोणा परिसरात त्यांचा कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत चालला. त्यानंतर नाशिकला परत जाण्यासाठी हे पाचही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी बसस्थानक परिसरात आले. मात्र यवतमाळ येथून रात्री नाशिकला जाण्यासाठी कोणतीही बस नव्हती. त्यामुळे हे विद्यार्थी कुठे जावे, काय करावे या विचारात चिंताग्रस्त झाले. कडाक्याच्या थंडीतही आयोजकांनी त्यांची व्यवस्था केली नव्हती.

ठळक मुद्देकार्यकर्त्यांचा संकल्प : भरकटलेल्या अंध विद्यार्थ्यांना दाखविला मार्ग

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ‘कोई जब राह न पाये, मेरे संग आये, के पग पग दीप जलाये’ १९६१ च्या दोस्ती सिनेमातील अंध मित्रांच्या जीवनातील अंधकार दूर करणारे हे गाणे मंगळवारी रात्री यवतमाळात प्रत्यक्ष घडले. झाले असे की, नाशिकचे दृष्टीहीन विद्यार्थी मध्यरात्री यवतमाळच्या बसस्थानकात अडकून पडले. त्यांना यवतमाळातील कार्यकर्त्यांनी संपूर्ण व्यवस्था करून थेट त्यांच्या गावापर्यंत पोहोचविले.येथील काव्य वाचन आणि गायनाच्या कार्यक्रमासाठी हे दृष्टीहीन विद्यार्थी आले होते. निळोणा परिसरात त्यांचा कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत चालला. त्यानंतर नाशिकला परत जाण्यासाठी हे पाचही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी बसस्थानक परिसरात आले. मात्र यवतमाळ येथून रात्री नाशिकला जाण्यासाठी कोणतीही बस नव्हती. त्यामुळे हे विद्यार्थी कुठे जावे, काय करावे या विचारात चिंताग्रस्त झाले. कडाक्याच्या थंडीतही आयोजकांनी त्यांची व्यवस्था केली नव्हती. त्यामुळे घाबरलेल्या अवस्थेतील हे विद्यार्थी फिरत होते. शेवटी संकेत लांबट या युवकाला त्यांची अवस्था लक्षात आली. त्यांनी नगरसेवक नितीन मिर्झापुरे यांना ही बाब सांगितली. लगेच संकल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रलय टिप्रमवार, विनोद दोंदल हे मध्यरात्री बसस्थानक परिसरात पोहोचले. त्यांनी या विद्यार्थ्यांना गाठून दिलासा दिला. नितीन मिर्झापुरे यांनी त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली. संकल्प फाऊंडेशनच्या व्यसनमुक्ती केंद्रात त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली. केंद्राचे समन्वयक मधुकर चुटे हे त्यांच्या दिमतीला होते. तर सकाळी ७ वाजता प्रलय टिप्रमवार यांच्या वाहनाने या विद्यार्थ्यांना नाशिकपर्यंत पोहोचवून देण्यात आले. यासाठी अभिषेक इंगोले, स्वप्नील उजवणे, संजय मडावी यांनी परिश्रम घेतले.