शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अजून कोणते जीवघेणे कफ सिरप? यवतमाळमध्ये सहा वर्षांच्या मुलाचा खोकल्याचे औषधें घेतल्याने मृत्यू? औषधीचे नमुने दिले प्रयोगशाळेत

By सुरेंद्र राऊत | Updated: October 13, 2025 13:04 IST

खासगी रुग्णालयात उपचार : सर्दी-खोकल्यासाठी केली होती तपासणी, अचानक प्रकृती बिघडली

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कफ सिरपमुळे २२ मध्य प्रदेश येथील बालकांच्या मृत्यूचे प्रकरण ताजे असताना, जिल्ह्यातील पिंपळखुटी (ता. कळंब) येथील बालकाचा सर्दी खोकल्याची औषधी घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी ७ ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला. सहा वर्षांच्या बालकाने यवतमाळ शहरातील बालरोगतज्ज्ञाकडून ४ व ६ ऑक्टोबर रोजी दोन दिवस औषध उपचार घेतले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी बाळाची प्रकृती बिघडली. पालकांनी त्याला त्या बालरोगतज्ज्ञाकडे नेले, त्यांनी बाळाला शासकीय रुग्णालयात रेफर केले. बालकाचा मृत्यू झाल्याने शवचिकित्सा केली. त्यानंतर एफडीएने संबंधित रुग्णालयातील मेडिकलमधून पाच औषधांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविले. या घटनेने प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे.

वीर वामनराव चौक येथील बालरोगतज्ज्ञाकडे सहा वर्षांच्या बाळाला सर्दी खोकल्याचा त्रास असल्याने पालकांनी उपचारासाठी आणले. ४ ऑक्टोबर रोजी प्रथम तपासणी करून ते गावी गेले. मात्र, दोन दिवसांच्या औषधानंतरही आराम नसल्याने त्यांनी पुन्हा ६ ऑक्टोबर रोजी बालरोगतज्ज्ञाचे हॉस्पिटल गाठले. औषधी बदलून देण्यात आली. सर्दी-खोकल्याची नवी औषधी घेऊन पालक गावी पोहोचले. तेथे दुसऱ्या दिवशी ७ऑक्टोबर रोजी सायंकाळी बालक अचानक बेशुद्ध पडले. त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. तातडीने पालकांनी बाळाला त्याच डॉक्टरकडे आणले. त्यांनी बाळाची प्रकृती पाहून हात वर करत त्याला शासकीय रुग्णालयात नेण्यास सांगितले. बाळाला अपघात कक्षातील डॉक्टरांनी तपासले असता त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.  संवेदनशील प्रकरण असल्याने त्या बाळाची शवचिकित्सा करण्यात आली.

बाळाचा व्हिसेरा रासायनिक विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला, तर इतर अवयव हिट्रॉपॅथालॉजीकडे तपासणीला दिले आहे. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून मेडिकल प्रशासनाने याची माहिती सहायक आयुक्त औषधी यांना दिली. जिल्हाधिकारी, आरोग्य सचिव यांनाही माहिती देण्यात आली. त्यानंतर औषधी प्रशासनाच्या पथकाने ते खासगी बालरुग्णालय गाठले. तेथील मेडिकलमधून बाळाला देण्यात आलेल्या सात औषधींचे नमुने घेतले. ही औषधी तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आली आहे.

'मेडिकल'च्या औषधांचीही तपासणी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे असलेल्या कफ सिरपचेसुद्धा नमुने तपासणीसाठी देण्यात आले आहे.मध्य प्रदेशच्या प्रकरणानंतर खबरदारी म्हणून दोन बॅन्डच्या कफ सिरपचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.

तपासणी अहवालाची प्रतीक्षा

सहा वर्षांच्या बाळाचा मृत्यू हा सर्दी-खोकल्याचा औषधाने झाला की, आणखी दुसरे कोणते कारण आहे. याचा उलगडा शवचिकित्सा अहवालानंतरच होणार आहे. सोबत बाळाने घेतलेल्या औषधीची तीन दिवस गुणवत्ता काय यावरूनही हे ठरणार आहे. त्यासाठी प्रयोगशाळेतील तपासणी अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे.

"मेडिकल कॉलेज प्रशासनाकडून पत्र प्राप्त झाल्यानंतर तारक चाईल्ड हॉस्पिटल येथील माही मेडिकलमधून पाच औषधांचे नमुने घेतले. एका औषधीचा नमुना घेणे बाकी आहे."- एम. के. काळेश्वरकर, सहायक आयुक्त, औषधी प्रशासन. 

English
हिंदी सारांश
Web Title : Yavatmal: Child Dies After Cough Syrup; Samples Sent for Testing

Web Summary : Following a child's death in Yavatmal after consuming cough syrup, suspected to be linked to a contaminated batch, authorities have launched an investigation. Samples of the medicine have been sent to the laboratory for testing to determine the cause.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रMadhya Pradeshमध्य प्रदेशHealthआरोग्यYavatmalयवतमाळ