शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

शाळा-महाविद्यालय असताना शिकवणीची गरज काय ?

By admin | Updated: September 5, 2014 00:08 IST

शाळा-महाविद्यालयात गलेलठ्ठ पगार घेणारे शिक्षक असताना विद्यार्थ्यांना खासगी शिकवणी लावावी लागत असेल तर शाळा-महाविद्यालयाची गरज काय असा सवाल पालक विचारत आहे.

पालकांचा सवाल : गावागावात फुटले पेवप्रकाश सातघरे - दिग्रसशाळा-महाविद्यालयात गलेलठ्ठ पगार घेणारे शिक्षक असताना विद्यार्थ्यांना खासगी शिकवणी लावावी लागत असेल तर शाळा-महाविद्यालयाची गरज काय असा सवाल पालक विचारत आहे. सध्या गल्लीबोळात शिकवणी वर्गाचे पीक आले असून शाळा-महाविद्यालयांपेक्षा येथेच गर्दी दिसत आहे. सकाळी दिवस निघाल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत प्रत्येक शहर आणि गावात ट्युशनला जाणारे विद्यार्थी दिसून येतात. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गर्दी ओसरली असून प्रत्येक जण शिकवणी लावण्यासाठी धडपडत असतो. वेळ, पैसा आणि शारीरिक धावपळीमुळे विद्यार्थी नेमका अभ्यास कधी करीत असेल हा संशोधनाचा विषय आहे. हसत खेळत शिक्षण आणि मूल्य रुजविण्याची शिक्षण पद्धती गेली कुठे असा प्रश्न आहे. शाळा, महाविद्यालयातील शिक्षक हा खासगी शिकवणी वर्गापेक्षा तज्ज्ञ असतो. अध्यापनाचे त्याने प्रशिक्षण घेतले असते. तसेच गलेलठ्ठ पगारही असतो. मात्र अलिकडे शिक्षक शिकवत नसल्याची बोंब होत आहे. अनेक विद्यार्थी शाळा-महाविद्यालयात जातात. परंतु पिरेड आॅफ करण्याकडे त्यांचा कल असतो. शाळेला दांडी मारणारे विद्यार्थी ट्युशन क्लासला मात्र न चुकता जाताना दिसतात. विशेष म्हणजे शाळा-महाविद्यालयाची सुसज्ज इमारत, बसण्यासाठी पुरेशी जागा, सर्व सुविधा असते. या उलट शिकवणी वर्गात कोंदट वातावरण, बसण्यासाठी अपुरी जागा, संख्या वाढली की अ‍ॅडजेस्टमेंट असा प्रकार असतो. अशा वातावरण मुले ज्ञानार्जन कसे करीत असतील असा प्रश्न आहे. मात्र आता पालकांच्याही शिकवणी वर्ग अंगवळणी पडला आहे. प्रतिष्ठित शिकवणी वर्गात आपला मुलगा जातो हे अभिमानाने सांगणारेही पालक आहे. काही वर्षापूर्वी शिकवणी वर्गाला जाणे म्हणजे कमीपणाचे लक्षण समजले जायचे. परंतु आता शिकवणी वर्गात जाणे प्रतिष्ठेचे झाले आहे.