ट्रकच्या धडकेत वेकोली कर्मचारी ठार; यवतमाळ जिल्ह्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 14:02 IST2020-05-07T14:02:11+5:302020-05-07T14:02:34+5:30
वणी मार्गावरील पळसोनी फाट्याजवळ ट्रकच्या धडकेत वेकोलि कर्मचारी जागीच ठार झाला. ही घटना गुरुवारी सकाळी ८ च्या सुमारास घडली.

ट्रकच्या धडकेत वेकोली कर्मचारी ठार; यवतमाळ जिल्ह्यातील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: वणी मार्गावरील पळसोनी फाट्याजवळ ट्रकच्या धडकेत वेकोलि कर्मचारी जागीच ठार झाला. ही घटना गुरुवारी सकाळी ८ च्या सुमारास घडली. संतोषकुमार गरीबदास (४०) असे मृताचे नाव असून तो चंद्रपूर जिल्ह्यातील माजरी येथील रहिवासी आहे. तो भादेवाडा येथील कोळसा खाणीत कार्यरत होता. सकाळी कामावर जात असताना ही घटना घडली. त्यावेळी त्याचा मुलगा प्रमोदकुमार हा दुचाकी चालवत होता. संतोषकुमारा मागच्या सीटवर बसलेला होता.