शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
3
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
6
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
7
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
8
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
9
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
10
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
11
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
12
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
13
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
14
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
15
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
18
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
19
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
20
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न करपण्याच्या मार्गावर

By admin | Updated: November 20, 2014 23:00 IST

येथील महावितरणच्या ३३ के.व्ही. उपकेंद्राचा कारभार नेहमी चर्चेचा विषय ठरतो. कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरूच असून ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

उपकेंद्राचा भोंगळ कारभार : हातचे पीक नष्ट होण्याची भीतीघोन्सा : येथील महावितरणच्या ३३ के.व्ही. उपकेंद्राचा कारभार नेहमी चर्चेचा विषय ठरतो. कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरूच असून ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. आता विजेअभावी शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्नही करपण्याच्या मार्गावर आहे.यावर्षी निसर्गाचा लहरीपणा आणि अपुरा पाऊस, यामुळे शेतकऱ्यांचे खरीप पीक धोक्यात सापडले आहे. त्यातच येथील महावितरण उपकेंद्राअंतर्गत विजेचे १0 तासांचे भारनियमन करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे हिरवे पीक संकटात सापडल्याचे दिसून येत आहे. या उपकेंद्राअंतर्गत जवळपास ४० गावांना वीज पुरवठा करण्यात येतो. याच उपकेंद्रातून कायर केंद्रालासुद्धा वीज पुरवठा करण्यात येतो. घोन्सा येथे पांढरकवडा येथून ३३ के.व्ही.चा वीज पुुरवठा करण्यात येतो. त्यातील जवळपास ११ के.व्हीचा पुरवठा हा कायर उपकेंद्रातील गावांना करण्यात येतो. उर्वरित २२ के.व्ही. वीज पुरवठ्यावर घोन्सा उपकेंद्रातील ४० गावांना वीज पुरवठा करण्यात येतो.या उपकेंद्रातील गावांना विजेच्या मागणीपेक्षा पुरवठा कमी होतो. त्यातच अनेकदा कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने अनेक शेतकऱ्यांचे शेतातील मोटारपंप सुरूच होत नाही. भारनियमन आणि कमी दाबाचा वीज पुरवठा, यामुळे परिसरातील शेतकरी संकटात सापडले आहे. त्यांना शेतात पाणी असूनही ओलीत करणे दुरापास्त झाले आहे. अनेक शेतकरी तर रात्री ओलीत करण्याचा प्रयत्न करतात. मात्र मधातच वीज गुल होत असल्याने ही बाबही दुरापास्त झाली आहे. या उपकेंद्राअंतर्गत येणारे अनेक विद्युत जनित्र बंद आहेत. अद्याप त्या ठिकाणी नवीन जनित्र बसविण्यात आले नाही. परिणामी शेतकऱ्यांच्या शेतात मोटारपंप आहेत, परंतु ते विजेअभावी कुचकामी ठरत असल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर)