शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

वणी तालुक्यावर पाणी टंचाईचे ढग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 22:37 IST

दरवर्षीप्रमाणे यंदाही वणी तालुक्याला पाणी टंचाईचे चटके सहन करावे लागणार आहे. मागील हंगामात अतिशय कमी पाऊस झाल्याने तालुक्यातील नाले, तलाव कोरडे पडले आहे. त्यामुळे आतापासूनच ग्रामीण भागात पाणी टंचाईची धग जाणवू लागली आहे.

ठळक मुद्देउपाययोजनांना वरिष्ठांकडे ब्रेक : पेटुरचा प्रश्न सुटला, नायगावला टँकरची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : दरवर्षीप्रमाणे यंदाही वणी तालुक्याला पाणी टंचाईचे चटके सहन करावे लागणार आहे. मागील हंगामात अतिशय कमी पाऊस झाल्याने तालुक्यातील नाले, तलाव कोरडे पडले आहे. त्यामुळे आतापासूनच ग्रामीण भागात पाणी टंचाईची धग जाणवू लागली आहे. यावर स्थानिक प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात असल्या तरी वरिष्ठ पातळीवर मात्र या उपाययोजनांना ब्रेक लागल्याचे दिसत आहे.वणी तालुक्यातील नायगाव (खु.) येथे पिण्यासाठी जलस्त्रोत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहे. त्यामुळे या गावाला टँकरद्वारे पाणी पुरवठा व्हावा, यासाठीचा प्रस्ताव दोन महिन्यापूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला. परंतु तो अद्यापही तेथे धूळ खात पडून आहे. नायगाव (खु.) ची लोकसंख्या एक हजार १२५ आहे. या गावात पिण्यायोग्य पाणी नसल्याने गावकऱ्यांना टँकरची प्रतीक्षा आहे. तालुक्यातील पेटूर येथे मागील वर्षापर्यंत नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागला. परंतु गावकºयांनी सतत केलेल्या पाठपुराव्यानंतर या गावाला मानकी येथील बोअरवेलवरून पाणी पुरवठा सुरू करण्यात आला. यावर्षी या गावाची चिंता मिटली आहे. तालुक्यातील गोपालपूर, वरझडी, वरझडी बंडा, वडगाव (टीप), खांदला, कुर्ली या गावांमध्ये बोअर अधिग्रहण करून गावकºयांना पाणी पुरविले जात आहे.संभाव्य पाणी टंचाई निवारणार्थ उमरी येथे बोअर अधिग्रहणाचा प्रस्ताव उपविभागीय अधिकाºयांनी मंजूर केला असला तरी अद्याप अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. निंबाळा (बु.) या गावाला पाणी पुरवठा करणाºया बोअरवेल अधिग्रहणाचा प्रस्ताव आराखड्यात मंजूर करण्यात आला. परंतु आराखडा अद्यापही अप्राप्त आहे. वणी तालुक्यातील सावंगी या गावातही पाणी पेटले आहे. या गावाला टँकरद्वारे पाणी पुरवठा प्रस्तावित आहे. पिंपरी (कायर), तेजापूर येथेही तिच परिस्थिती आहे.पाण्याअभावी जनावरांचेही होणार हालजंगलातील तलाव, नाले व अन्य जलस्त्रोत आतापासूनच कोरडे पडले आहेत. त्यामुळे पाण्यासाठी आतापासूनच जनावरांचे हाल सुरू झाले आहे. वणी, मारेगाव व झरी या तीन तालुक्यात घनदाट जंगल आहे. या जंगलात वन्यजिवांची संख्याही मोठी आहे. मात्र पाण्याअभावी या वन्यजिवांचेही हाल होणार आहे. पाळीव जनावरे चरण्यासाठी जंगलात जातात. परंतु त्यांना त्याठिकाणी पिण्यासाठी पाणीच उपलब्ध नसल्याचे चित्र परिसरातील जंगलांमध्ये पाहावयाला मिळत आहे. यंदा माणसांसोबत जनावरांचेदेखिल पाण्यासाठी हाल होणार आहेत.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई