शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

शेतकऱ्यांच्या परिश्रमावर निसर्गाने फेरले पाणी

By admin | Updated: October 13, 2014 23:28 IST

मागील १० वर्षात जिल्ह्याने आठवेळा नैसर्गिक आपत्तीचा सामना केला आहे. यामध्ये यावर्षीचा निसर्ग प्रकोपाने पुन्हा भर घातली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या सर्व मेहनतीवर पाणी फेरल्या गेले आहे.

यवतमाळ : मागील १० वर्षात जिल्ह्याने आठवेळा नैसर्गिक आपत्तीचा सामना केला आहे. यामध्ये यावर्षीचा निसर्ग प्रकोपाने पुन्हा भर घातली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या सर्व मेहनतीवर पाणी फेरल्या गेले आहे. मोठ्या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांना प्रकोपामुळे दिवाळी अंधारात साजरी करावी लागणार आहे. एकीकडे निवडणुकीने वातावरणात दिवाळीचा जल्लोष आत्तापासूनच सुरू झाला असताना शेतकऱ्यांच्या कुटुंबात मात्र अंधकार पसरला आहे. यातून शेतकरी काळजीत सापडला आहे. आपले गाऱ्हाणे कुणाकडे मांडायचे आणि आपल्या मदतीला कोण धावणार, असा पेचही शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणारा कापूस दसऱ्यानंतर बाजारात येतो. यावर्षी पेरण्या लांबल्याने कपाशीचे पिकही लांबले आहे. अशातच विविध रोगांचे आक्रमण पिकांवर झाल्याने पहिल्याच वेचात कपाशी उलंगवाडीवर येईल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे सोयाबीनही उन्हाच्या पाऱ्याने अपरिपक्व अवस्थेत करपले आहे. दोनही मुख्य नगदी पिकेच निसर्गाने हिरावून घेतल्याने संसाराचा गाडा चालवायचा कसा, असा गंभीर पेच शेतकरी कुटुंबापुढे निर्माण झाला आहे. दिवाळी हा सर्वात मोठा सण साजरा करण्यासाठी घरात कुठलेही धान्य शिल्लक राहिले नाही.निवडणुकीच्या झगमगाटात शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नाकडे लक्ष देण्यास कुणाकडेही वेळ नाही. सर्व अधिकारी, कर्मचारीसुद्धा निवडणूक प्रक्रियेत कार्यरत आहेत. शासनाच्या कोणत्याही कार्यालयात सध्या शेतकरी व सर्वसामन्यांचे कोणतेही कामे होताना दिसत नाही. मग उत्तम परिस्थिती कशी महसूल प्रशासनाने नजर आणेवारीचा अहवाल नुकताच सादर केला. जिल्ह्याची आणेवारी सरासरी ५७ टक्के दर्शविण्यात आली. याचा अर्थ पीक परिस्थिती उत्तम असल्याचा होतो. महसूली भाषेत ५० टक्क्यांच्या वर आणेवारी असल्यास स्थिती चांगली मानली जाते. प्रत्यक्षात शेतशिवार ओस पडताहेत अशा स्थितीत महसूल प्रशासनाने उत्तम परिस्थितीचा अहवाल सादर करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचेच काम केले असल्याचे दिसून येत अहे. यातून ग्रामीण भागामध्ये संतापाची लाट पसरली आहे. (शहर वार्ताहर)