शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
2
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
3
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
4
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
5
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
6
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
7
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
8
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
9
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
10
स्मरण दिन अन् गुरुवार, सलग २ दिवस सेवा करायची सुवर्ण संधी; स्वामी महाराज शुभ तेच होईल!
11
स्वामी समर्थ पुण्यतिथी: 'स्वामी' म्हणजे नक्की कोण? 'या' शब्दाचा गर्भितार्थ तुम्हाला माहीत होता का?
12
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
13
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
14
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
15
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
16
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
17
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
18
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
19
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
20
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
Daily Top 2Weekly Top 5

एकच आर्जव धो धो... पाऊस येवू दे..!

By admin | Updated: May 31, 2017 00:30 IST

राज्यात हॉट सिटी म्हणून ओळख असलेल्या पुसद शहरात यंदा तापमानाने ४६ शी गाठली. त्यात झालेली नागरिकांची

घालमेल वाढली : शेतकरी पेरणीस सज्ज, पावसाची प्रतीक्षा लोकमत न्यूज नेटवर्क पुसद : राज्यात हॉट सिटी म्हणून ओळख असलेल्या पुसद शहरात यंदा तापमानाने ४६ शी गाठली. त्यात झालेली नागरिकांची तगमग आणि हवामान खात्याचा आलेला सुखद अंदाज यामुळे आतुर झालेल्या बळीराजाच्या मुखातून एकच शब्द निघत आहे, धो...धो... पाऊस येवू दे. यावर्षीच्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात सरासरीपेक्षा अधिक आणि समाधानकारक पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरो, या वर्षी पाऊस सर्वत्र भरपूर व्हावा अगदी महापूर आला तरी चालेल. अनेक वर्षाच्या दुष्काळाचा ताण संपून जावा अशीच इच्छा तमाम जनतेची मनापासून आहे. आकाशातून पडणारा पाऊस जगण्याचा आधार बनतो हे त्रिकालबाधित सत्य आहेत. तो नाही आता तर काय होते याचा अनुभव आपण घेतोच आहोत. येरे येरे पावसा तुला देतो पैसा, येग येग सरी माझे मडके भरी, या कविता पाठ नसतील अशी पिढी मिळणे कठीण. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अगदी ३ जूनपासून पाऊस सुरू होईल असे व्यक्त करण्यात आले आहे. पूर्वी हवामान खात्याचा अंदाज हा विनोदाचा भाग मानला जायचा परंतु त्यात नक्कीच सुधारणा झाली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कोणत्या शहराभोवती ढग जमा आहेत. त्या ढगामध्ये पाण्याची आर्द्रता आणि घनता किती आहे. याचा अंदाज संगणक प्रणालीद्वारे घेता येवू लागला. त्यामुळे यावर्षीच्या मोसमात भरपूर पाऊस पडणार या भाकितावर सर्वांकडूनच समाधान व्यक्त केले जात आहे. यावर्षीच्या हवामान खात्याचा अंदाज खरा ठरल्यास ही वेळ लवकरच येवून परिसरात पावसाची उणिव निश्चित भरून निघणार आहे. मान्सूनचे आगमन कधी होते आणि धो धो पाऊस कधी बरसतो याचीच शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.