पांदण रस्त्यासाठी सामूहिक आत्मदहनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 05:01 IST2020-06-16T05:00:00+5:302020-06-16T05:01:12+5:30

घाटंजी ते आमडी हा पूर्वापार रस्ता आहे. घाटंजीपासून दोन किलोमीटर अंतरावर हा रस्ता जेसीबीने खोदण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात शेतीसाहित्य नेणे कठीण झाले. गट क्र. १५१ मध्ये गैरकायदेशीररित्या रस्ता खोदून वाहतुकीस बंद केल्याची तक्रार घाटंजी तहसीलदारांकडे करण्यात आली होती. मात्र महिना लोटूनही रस्ता खुला झाला नाही.

A warning of mass self-immolation for the paved road | पांदण रस्त्यासाठी सामूहिक आत्मदहनाचा इशारा

पांदण रस्त्यासाठी सामूहिक आत्मदहनाचा इशारा

ठळक मुद्देघाटंजी येथील शेतकरी : प्रशासनाच्या वेळकाढू धोरणाचा निषेध, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
घाटंजी : येथील ग्रामीण रुग्णालय ते आमडी हा पांदण रस्ता आहे. हा रस्ता जेसीबीने खोदून वाहतुकीस बंद केला. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात बियाणे व शेती साहित्य घेऊन जाणे अवघड झाले आहे. हा रस्ता खुला करून देण्याच्या मागणीसाठी शेतकºयांनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
घाटंजी ते आमडी हा पूर्वापार रस्ता आहे. घाटंजीपासून दोन किलोमीटर अंतरावर हा रस्ता जेसीबीने खोदण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात शेतीसाहित्य नेणे कठीण झाले. गट क्र. १५१ मध्ये गैरकायदेशीररित्या रस्ता खोदून वाहतुकीस बंद केल्याची तक्रार घाटंजी तहसीलदारांकडे करण्यात आली होती. मात्र महिना लोटूनही रस्ता खुला झाला नाही. मध्यंतरी या रस्त्याचा सीमावाद उत्पन्न करून त्याची जबाबदारी जिल्हा परिषदेवर टाकण्याचा प्रयत्न झाला. मंडळ अधिकारी व तलाठ्यांनी तसा अहवाल देवून दिशाभूल केली. मात्र जिल्हा परिषदेने दिलेल्या पत्राने तहसीलचे बिंग फुटले. तहसीलच्या वेळकाढू धोरणामुळे आता शेतकरी त्रस्त झाले आहे. त्यामुळे शेतकºयांनी प्रशासनाला रस्ता खुला न केल्यास सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
निवेदनावर प्रभाकर शेंडे, दत्ता शेंडे, गणेश लेणगुरे, मंदा आडे, मीरा धुर्वे, सावित्री धुर्वे, अशोक लिंगायत, लिलाबाई लिंगायत, बेबी राऊत, विशाल राऊत, अमोल राऊत आदींच्या स्वाक्षऱ्या आहे.

Web Title: A warning of mass self-immolation for the paved road