शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

बालकांवरील अत्याचारप्रकरणी वणीच्या संस्थाध्यक्षाला अटक

By admin | Updated: September 11, 2016 00:56 IST

नर्सरीत जाणाऱ्या निष्पाप कोवळ्या बालकांवरील अत्याचारप्रकरणी स्वस्तिक बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष दीपक जीवने यांना शुक्रवारी रात्री पोलिसांनी अटक केली.

घटनेचा सर्वस्तरातून निषेध : सर्वपक्षीय बंदला उत्स्फूर्त प्रतिसादवणी : नर्सरीत जाणाऱ्या निष्पाप कोवळ्या बालकांवरील अत्याचारप्रकरणी स्वस्तिक बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष दीपक जीवने यांना शुक्रवारी रात्री पोलिसांनी अटक केली. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या आता चार झाली आहे. या संस्थेच्याअंतर्गतच स्थानिक छोरीया ले-आऊटमध्ये ड्रीम्स् प्ले स्कूल चालविली जाते. अटकेनंतर शनिवारी दुपारी दीपक जीवने यांना न्यायालयात हजर करण्यासाठी यवतमाळ येथे नेण्यात आले. दरम्यान, शनिवारी या घटनेचा निषेध करण्यासाठी वणी बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे शहरातील सर्वच शाळा-महाविद्यालय बंद होते. सकाळी ८ वाजता सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकांऱ्यांनी एकत्र येऊन मोर्चा काढला. या मोर्चात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चाद्वारे बंदचे आवाहन करण्यात येत होते. त्यानंतर शहरातील टिळक चौकात सभा पार पडली. या सभेत आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, प्रा.पुरूषोत्तम पाटील, कॉ.गीत घोष, अजय धोबे, अ‍ॅड.निलेश चौधरी, रवी बेलूरकर आदींची भाषणे झाली. या सर्वांनी घटनेचा निषेध करून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी लावून धरली. या सभेनंतर मोर्चेकऱ्यांनी उपविभागीय कार्यालयात जाऊन उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शासन करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदन दिल्यानंतर सर्व पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी छोरीया ले-आऊटस्थित ड्रीम्स प्ले स्कूलसमोर जाऊन घोषणाबाजी करीत घटनेचा निषेध नोंदविला. भारतीय जनता पार्टी वणी शहरच्यावतीनेही उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन अशा घटना घडू नयेत, यासाठी संस्था चालकावर गुन्हा नोंद करावा, अशी मागणी करण्यात आली. हे निवेदन शहर अध्यक्ष रवी बेलूरकर यांच्या नेतृत्वात देण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)