वेकोलिच्या मनमानीने उकणी रस्ता ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 22:15 IST2018-07-07T22:13:51+5:302018-07-07T22:15:02+5:30
वेकोलिच्या कोळसा खाणीने लावालगत मातीचे ढिगारे टाकल्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास मार्गच नसल्यामुळे हे पाणी रस्त्यावर साचले आहे. त्यामुळे उकणी जोडरस्ता ठप्प पडला आहे.

वेकोलिच्या मनमानीने उकणी रस्ता ठप्प
लोकमत न्यूज नेटवर्क
उकणी : वेकोलिच्या कोळसा खाणीने लावालगत मातीचे ढिगारे टाकल्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास मार्गच नसल्यामुळे हे पाणी रस्त्यावर साचले आहे. त्यामुळे उकणी जोडरस्ता ठप्प पडला आहे.
या रस्त्याच्या शेजारी असणाºया शेतातही पुराचे पाणी शिरल्यामुळे पिकांचेही नुकसान झाले आहे. गेल्या पाच वर्षापासून ही समस्या उद्भवत आहे. याबाबत ग्रामपंचायतीने वारंवार वेकोलि प्रशासनाला निवेदने दिली. मात्र त्याची दखलच घेण्यात येत नाही. त्यामुळे वेकोलि प्रशासनाने ही समस्या तातडीने कायमस्वरूपी निकाली काढावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा सरपंच संगीता खाडे, उपसरपंच नरेंद्र बलकी, ग्रामपंचायत सदस्य सतिश खाडे, सोमेश्वर खाडे, बेबी बोरपे आदींनी दिला आहे.