शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

२८०० कर्मचाऱ्यांना थकीत वेतनाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 05:00 IST

त्यामुळे काही प्रमाणात का होईना या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र आणखी दोन महिन्यांचा पगार महामंडळाकडे थकीत आहे. हाती आलेल्या पगारातून दिवाळी भागणार आहे. मात्र मागील काळात पडलेला मोठा खड्डा बुजविण्यासाठी थकीत पगार मिळण्याची गरज आहे.

ठळक मुद्देएसटीचा एका महिन्याचा पगार झाला; दिवाळीत थोडाफार आधार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मागील नऊ महिन्यांपासून वेतनात अनियमितता असल्याने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचारी गोंधळून गेले आहेत. पैसा वेळेवर हाती येत नसल्याने आर्थिक व्यवहारात अडचणी येत आहे. गेली तीन महिन्यांपासून तर त्यांचा प्रचंड आर्थिक कोंडमारा झाला आहे. यवतमाळ विभागातील दोन हजार ८०० कर्मचारी कठीण परिस्थितीतून दिवस काढत आहेत. दिवाळीतही पगार मिळतो की नाही याविषयी शंकाच होती. अखेर महामंडळाने या कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा पगार दिला. त्यामुळे काही प्रमाणात का होईना या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र आणखी दोन महिन्यांचा पगार महामंडळाकडे थकीत आहे. हाती आलेल्या पगारातून दिवाळी भागणार आहे. मात्र मागील काळात पडलेला मोठा खड्डा बुजविण्यासाठी थकीत पगार मिळण्याची गरज आहे.चरितार्थ थांबलातीन महिन्यांपासून पगार नव्हता. त्यामुळे किराणा दुकानाची उधारी थांबली. घरभाडे, मुलांच्या शाळेची फी हे व्यवहार रखडले आहे. घरातील ज्येष्ठ मंडळींच्या औषध पाण्याचा खर्च भागविताना नाकीनऊ आले. ही परिस्थिती सुधारण्यासाठी बराच वेळ लागेल.सामूहिक प्रयत्नातून संकट दूर होईलएसटीवर यापूर्वीही अनेकदा आर्थिक संकटं आली. यातून मार्ग निघाले. महामंडळ आजही तोट्यात आहे. मिळालेल्या एक महिन्याच्या पगारातून थोडाफार आधार झाला. पुढील काळातील वेतन नियमित होणे आवश्यक आहे. एसटी आर्थिकदृष्ट्या सुदृढ करण्यासाठी सामूहिक प्रयत्नाची गरज आहे.-प्रवीण मिश्रा, एसटी कर्मचारीदिवाळीसाठी २८ बसेसमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागातर्फे दिवाळीसाठी जादा २८ बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. पुणे, मुंबई यासह इतर ठिकाणासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. विशेषत: महामंडळाचा पुणेवर जादा भर आहे.वेतनासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. सोमवारी आक्रोश आंदोलन करण्यात आले. एक महिन्याच्या पगारातून उधारी चुकवावी लागणार आहे. पुढे जैसे थे परिस्थिती होईल.- राहुल धार्मिक, यवतमाळ विभागीय अध्यक्ष, एसटी कामगार संघटना