शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
4
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
5
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
6
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
7
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
8
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
9
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
10
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
11
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
12
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
13
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
14
आता पाहा, मित्र-मित्रच एकमेकांना कापताना दिसतील!
15
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
16
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
17
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
18
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
19
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
20
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात

Video : वाहत गेलेल्या बसचा व्हिडिओ व्हायरल, मदतीसाठी युवकांच्या लगेचच पाण्यात उड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 10:22 IST

सध्या बस पुलावरुन पुढे जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, बस पुलावरून हळूवारपणे पाण्यात जाताना दिसते. त्यानंतर, पुढे जाऊन बस पलटी झाल्याचेही दिसून येते.

ठळक मुद्देआज सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच तहसिलदार आनंद देऊळगावककर व उमरखेडचे ठाणेदार अमोल माळवे यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे

यवतमाळ - हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार सोमवारी सायंकाळपासून मराठवाडा आणि विदर्भाला पावसाने झोडपले आहे. येथील नद्या नाले, ओढे तुडुंब भरले असून शेकडो गावांची वाताहात झाल्याचं पाहायला मिळत आहे. गावागावात पाणी शिरले असून मदत व बचावकार्य सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड गावापासून 2 किमी अंतरावरील गावात पुलावरुन बस वाहून गेल्याची दुर्घटना घडली आहे. 

उमरखेड ते पुसद मार्गावर दहागाव नाल्यावर नागपुर आगाराची बस क्र. ५०१८ वाहून गेली, त्यामध्ये वाहक आणि चालकासह 5 जण होते. आज सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच तहसिलदार आनंद देऊळगावककर व उमरखेडचे ठाणेदार अमोल माळवे यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. सध्या, स्थानिक आणि प्रशासनाच्या मदतीने मदत व बचावकार्य सुरू आहे. 

सध्या बस पुलावरुन पुढे जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, बस पुलावरून हळूवारपणे पाण्यात जाताना दिसते. त्यानंतर, पुढे जाऊन बस पलटी झाल्याचेही दिसून येते. बस पलटी झाल्याचे दिसताच, पुलाजवळ उभारलेल्या तरुणांनी धावत जाऊन पाण्यात उड्या घेतल्या असून मदतीसाठी तात्काळ धाव घेतल्याचेही व्हिडिओत दिसून येते. 

दरम्यान,  बीड, परभणी, बुलडाणा, औरंगाबाद, अकोला, नांदेडला जिल्ह्यांना पावासाने झोडपले आहे. अनेक गावांत पाणी शिरले असून धरणे भरली आहेत. तर, विदर्भातील उमरखेड येथे पुराच्या पाण्यात बस वाहून गेल्याची दुर्घटना घडली.    

टॅग्स :YavatmalयवतमाळBus Driverबसचालकumarkhed-acउमरखेडRainपाऊसAccidentअपघातCyclone Gulabगुलाब चक्रिवादळ