शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

संत रविदासांच्या विचारात समाजाची उन्नती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2019 6:00 AM

इस्लाम स्वीकारणारा कोणताही व्यक्ती इतरांचा वैरी असू शकत नाही. प्रेषित महम्मद पैगंबर हे प्रखर मानवतावादी होते. त्यांनी समतेसाठी सतत संघर्ष केला. स्त्रियांचे संरक्षण, त्यांचे हक्क, अधिकार अबाधित ठेवण्यासाठी पवित्र कुराणात उपदेश केले. लोकोपयोगी कार्य करणारे महापुरुष, संतांना इस्लाममध्ये आदरयुक्त भावनेने सन्मान दिला जातो.

ठळक मुद्देकल्याणी पद्मने : रविदास विचार मंच आणि जमात-ए-इस्लामी हिंदच्या संयोजनात स्मृती पर्वात व्याख्यान

काशीनाथ लाहोरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : संत रविदासांच्या समकालीन संतांनी त्यांचे श्रेष्ठत्व मान्य केले, अनेकांनी त्यांना गुरुस्थानी मानले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाबू जगजीवनराम, ग्यानी झैलसिंग यांनीही संत रविदासांचे विचार आणि तत्त्वज्ञान समाजाला दिशा देणारे आहे, असे गौरवोद्गार काढले आहेत. आम्ही मात्र त्यांचा उपदेश आणि विचारांपासून दूर गेलो. परिणामी आमची सर्व बाजूंनी अधोगतीच झाली. असे मत प्रसिद्ध विचारवंत डॉ. कल्याणीताई पद्मने यांनी व्यक्त केले.येथील आझाद मैदानातील स्मृतिपर्वात गुरू रविदास विचार मंचच्या संयोजनात आयोजित व्याख्यानात ‘१५ व्या शतकातील संत रविदासांची जाज्वल्य विचारधारा व आधुनिक काळातील समन्वकीय सामाजिक भूमिका’ या विषयावर त्या बोलत होत्या.प्रमुख अतिथी म्हणून संध्याताई बांगडे, सुजाता मोकडे, संगीता वानरे, भारतीताई तांडेकर, लता सोनटक्के, कमलताई पतके, उषाताई ठाकरे, वनिताताई झाडे, वर्षाताई डहाके, आशाताई वर्षे, संगीता इंगळे, वैशालीताई बच्छराज, कैवल्याताई कुंभरे, शुभांगी मालखेडे आदींची उपस्थिती होती.या कार्यक्रमात देवीदासजी खंडारे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आणि शेषरावजी सूर्यवंशी स्मृतिप्रीत्यर्थ कौटुंबिक सत्कार करण्यात आला. समाजातील ज्येष्ठ साहित्यिक व लेखक खुशालराव डवरे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच अनेक मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यात प्रामुख्याने चंद्रशेखर लहाडके, उत्तमराव इसाळकर, सुनील बांगडे, देवानंद तांडेकर, बळीराम पतके, मायाताई चंदनकर, प्रा. तृष्णा मोकडे यांचा समावेश आहे. संचालन अमर तांडेकर यांनी केले. आभार मोहन लोखंडे यांनी मानले.‘इस्लाम’ समाज परिवर्तनाचा विचार आहे - वाजित कादरीयवतमाळ : इस्लाम स्वीकारणारा कोणताही व्यक्ती इतरांचा वैरी असू शकत नाही. प्रेषित महम्मद पैगंबर हे प्रखर मानवतावादी होते. त्यांनी समतेसाठी सतत संघर्ष केला. स्त्रियांचे संरक्षण, त्यांचे हक्क, अधिकार अबाधित ठेवण्यासाठी पवित्र कुराणात उपदेश केले. लोकोपयोगी कार्य करणारे महापुरुष, संतांना इस्लाममध्ये आदरयुक्त भावनेने सन्मान दिला जातो. महात्मा जोतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची समता आणि इस्लाममधील समता ही एकच आहे, असे विचार सुप्रसिद्ध विचारवंत व जमात-ए-इस्लामी (हिंद)चे अध्यक्ष वाजित कादरी (औरंगाबाद) यांनी मांडले. जमात-ए-इस्लामी हिंद यवतमाळच्यावतीने आयोजित व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते. ‘भारताच्या बहुजन समाजापुढील आव्हाने आणि त्यावरील उपाय’ या विषयावरील व्याख्यानात त्यांनी विचार व्यक्त केले. अध्यक्षस्थानी डॉ. दीपक शिरभाते होते. मंचावर फारूखभाई, शकीलभाई, डॉ. अब्रार खान, मन्सूर एजाज जोश, शेख मेहबूब आलम, रियाझ सिद्दिकी, झियाउद्दिनभाई, वसीम खान, ज्ञानेश्वर गोरे, कवडूजी नगराळे, विलास काळे, सुनील वासनिक, संजय बोरकर, विश्वास वालदे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक काजी निजामुद्दिन, संचालन प्रा. सैयद मोहसीन यांनी केले. आभार सईद चाऊस यांनी मानले.आजचे व्याख्यानस्मृती पर्वात ३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता भटक्या विमुक्त जमातीच्या संयोजनात व्याख्यान होणार आहे. ‘भटके विमुक्त व शासकीय आयोग’ या विषयावर अखिल भारतीय तांडा सुधार समिती नागपूरचे संस्थापक अध्यक्ष नामा बंजारा हे विचार मांडतील. जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरीताई आडे अध्यक्षस्थानी राहतील. व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाबूसिंग कडेल यांनी केले आहे.