अज्ञात वाहनाची ओमनीला धडक; तीन ठार, एक गंभीर जखमी, कंरजीजवळील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 10:01 AM2023-07-11T10:01:09+5:302023-07-11T10:01:43+5:30

जखमीवर उमरी येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Unknown vehicle collided with Omni; Three killed, one seriously injured | अज्ञात वाहनाची ओमनीला धडक; तीन ठार, एक गंभीर जखमी, कंरजीजवळील घटना

अज्ञात वाहनाची ओमनीला धडक; तीन ठार, एक गंभीर जखमी, कंरजीजवळील घटना

googlenewsNext

करंजी (यवतमाळ): भरधाव अज्ञात वाहनाची  मारोती ओमनीला धडक बसून झालेल्या अपघातात तीनजण जागीच ठार झाले, तर एकाची प्रकृती गंभीर आहे. हा भीषण अपघात मंगळवारी सकाळी ६.१५ वाजताच्या सुमारास करंजीपासून एक किलोमिटर अंतरावर असलेल्या कोठोडा गावालगत घडला.

जखमीवर उमरी येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. वरोरा येथून पांढरकवडा येथे वृत्तपत्राची पार्सल पोहचवण्यासाठी जात असताना ही दुर्घटना घडली.  किशोर पंजाब बोरकर (५०) रा. वरोरा असे मृत चालकाचे नाव आहे.  पुढील तपास पांढरकवडा पोलीस  करीत आहे.

Web Title: Unknown vehicle collided with Omni; Three killed, one seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.