नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटले, काका-पुतण्या जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2021 15:15 IST2021-12-28T15:05:06+5:302021-12-28T15:15:27+5:30

आज सकाळच्या सुमारास राहुल हा रोटाव्हेटर घेऊन ट्रॅक्टरने शेताकडे निघाला होता. दरम्यान, नागपूर-तुळजापूर महामार्गावरील उडाण पुलावरून जाताना राहुलचे नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर उलटले.

Uncle and nephew killed on the spot as tractor overturns | नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटले, काका-पुतण्या जागीच ठार

नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटले, काका-पुतण्या जागीच ठार

यवतमाळ : रोटाव्हेटर घेऊन जाणारा ट्रॅक्टर उलटल्याने काका-पुतण्या जागीच ठार झाले. हा अपघात मंगळवारी सकाळी आर्णी तालुक्यात जवळानजीक उड्डाण पुलाजवळ घडला.

राहुल अरुण जवके (२५) आणि देऊ गोलू जवके (२), अशी मृतांची नावे आहेत. आज सकाळच्या सुमारास राहुल जवके हा रोटाव्हेटर घेऊन ट्रॅक्टरने (एमएच-२९-पीपी-६०२५) शेताकडे निघाला होता. यावेळी पुतण्या गोलू हा देखील त्याच्यासोबत होता. दरम्यान, नागपूर-तुळजापूर महामार्गावरील उडाण पुलावरून जाताना राहुलचे नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर उलटले.

या अपघातात राहुल व त्याचा पुतण्या देऊ हे दोघेही जागीच ठार झाले. एकाच कुटुंबातील दोघे मृत्यू पावल्याने गावात शोककळा पसरली आहे. या घटनेचा अधिक तपास ठाणेदार पीतांबर जाधव यांच्या मार्गदर्शनात बीट जमादार भारती व अरुण पवार करीत आहेत.

Web Title: Uncle and nephew killed on the spot as tractor overturns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.