शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

संचालक निवडणुकीवर अनिश्चिततेचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 05:00 IST

जिल्हा बँक संचालक मंडळाची मुदत संपल्याने तेथे प्रशासक बसविण्यासाठी शिवसेनेचा आग्रह होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाने प्रशासकाबाबतचा सहकार प्रशासनाचा अर्ज यापूर्वीच नाकारला आहे. राज्य सरकारनेही प्रशासकाऐवजी सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकल्या आहेत. जुन्याच मंडळांना पुढील निवडणुकीपर्यंत कायम ठेवण्याचे सूचविले आहे. याबाबत १० जुलै २०२० रोजी राज्यपालांनी जारी केलेल्या अधिसूचनेतही स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.

ठळक मुद्देजिल्हा बँक : प्रशासकाचा मार्ग खुंटला

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीबाबत लॉकडाऊनमुळे आता अनिश्चितता दिसू लागली आहे. मतदान घेतल्यास कोरोना संसर्ग वाढण्याची भीती प्रशासनाला आहे.जिल्हा बँक संचालक निवडणुकीचे भिजत घोंगडे आहे. काही संचालक निवडणुकीसाठी आग्रही आहेत. तर पुन्हा निवडून येण्याची शाश्वती नसलेले संचालक निवडणूक होऊ नये अशा मन:स्थितीत आहेत. दरम्यान सहकार निवडणूक प्राधिकरणाने कोविड-१९ मध्ये बॅक संचालक मंडळाची निवडणूक घेता येईल काय अशी विचारणा जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यासाठी सकारात्मकता दाखविली असली तरी कोरोना संसर्गाची भीतीही व्यक्त केली आहे. निवडणूक घ्यायची असेल तर मतदान केंद्रांवर गर्दी टाळणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, मास्क लावणे यावर सर्वाधिक भर देण्याच्या सूचना केल्या आहेत. प्रशासनाचा हा अहवाल निवडणूक प्राधिकरणाकडे गेला आहे. परंतु तेथे या अहवालावर पुढील निर्णय घेऊन कार्यवाही करण्यासाठी मनुष्यबळच उपलब्ध नाही. त्यातच आता पुण्यात काटेकोर लॉकडाऊन केल्याने सहकार निवडणूक प्राधिकरणाकडून यवतमाळ जिल्हा बँक निवडणुकीबाबत तत्काळ काही निर्णय घेतला जाण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे सध्या तरी या निवडणुकीबाबत एकूणच अनिश्चिततेचे सावट पहायला मिळत आहे.जिल्हा बँक संचालक मंडळाची मुदत संपल्याने तेथे प्रशासक बसविण्यासाठी शिवसेनेचा आग्रह होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाने प्रशासकाबाबतचा सहकार प्रशासनाचा अर्ज यापूर्वीच नाकारला आहे. राज्य सरकारनेही प्रशासकाऐवजी सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकल्या आहेत. जुन्याच मंडळांना पुढील निवडणुकीपर्यंत कायम ठेवण्याचे सूचविले आहे. याबाबत १० जुलै २०२० रोजी राज्यपालांनी जारी केलेल्या अधिसूचनेतही स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा बँकेवर आता प्रशासक नियुक्त होणार नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळे विद्यमान संचालक मंडळाला बँकेसाठी प्रत्यक्ष मतदान होईपर्यंत दिलासा मिळाल्याचे दिसते.बँकेत बैठका मात्र सुरूचजिल्हा बँक निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने संचालक मंडळाला धोरणात्मक निर्णय घेण्यास मनाई आहे. परंतु संचालक मंडळाच्या नियमित बैठका सुरूच आहेत. प्रत्येक आठवड्यात एक-दोन बैठका घेतल्या जात आहेत. कर्जमाफी, शिखर बँकेचे कर्ज, वसुली, खर्चाला मंजुरी, नवे प्रस्ताव यावर निर्णय घेतले जात आहे.

टॅग्स :bankबँक