शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

उमरखेड तालुक्यात कोरोना सावटात बेरोजगार युवकांवर आले गंडांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 05:00 IST

आधुनिक काळात युवकांचा कल ऑनलाईन पद्धतीकडे वाढला आहे. एका हातात अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईल युवक फिरताना दिसत आहे. मात्र त्यांच्याकडे आर्थिक उत्पन्नाचे कोणतेही साधन उपलब्ध नाही. शासन त्यांना रोजगार देऊ शकत नाही. यामुळे अनेक तरुणांचे मानसिक संतुलन ढासळत आहे. यातूनच काही युवक व्यसनांच्या आहारी जात असल्याचे चित्र शहर व तालुक्यात दिसून येत आहे.

ठळक मुद्देहातांना कामच नाही । पदवी, पदव्युत्तर रिकामे, शेतकरी व नागरिकही आले संकटात

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : कोरोनाच्या सावटात तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांवर गंडांतर आले आहे. हाताला काम मिळत नसल्याने युवक हताश होत आहे. याशिवाय शेतकरी आणि सामान्य नागरिकही कोरोनाच्या संकटामुळे हवालदिल झाले आहे.आधुनिक काळात युवकांचा कल ऑनलाईन पद्धतीकडे वाढला आहे. एका हातात अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईल युवक फिरताना दिसत आहे. मात्र त्यांच्याकडे आर्थिक उत्पन्नाचे कोणतेही साधन उपलब्ध नाही. शासन त्यांना रोजगार देऊ शकत नाही. यामुळे अनेक तरुणांचे मानसिक संतुलन ढासळत आहे. यातूनच काही युवक व्यसनांच्या आहारी जात असल्याचे चित्र शहर व तालुक्यात दिसून येत आहे. शहरात सुशिक्षित बेरोजगार युवकांना कुटुंबाचा गाडा चालविणाऱ्या आपल्या आई, वडिलांना सहकार्य करण्याची भरपूर इच्छा आहे. मात्र ऑनलाईन व्यवस्थेमुळे व्यापार ठप्प पडत आहे. याच ऑनलाईनमुळे स्थानिक रोजगार हिरावले जात आहे. परिणामी आर्थिक उत्पन्नाचे मार्ग हळूहळू बंद होत आहे.शासन ऑनलाईन व कॅशलेस व्यवहारांवर भर देत आहे. एक प्रकारे ऑनलाईन आणि कॅशलेस व्यवहार करण्याची सक्ती केली जात आहे. याकडे युवक आकर्षित होत आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून शासनाची नोकर भरती ठप्प पडली आहे. त्यामुळे युवक बेरोजगार आहे. खासगी शाळांवर कार्यरत युवा शिक्षक तुटपुंजा मानधनावर काम करीत आहे. शासकीय नोकरीची अपेक्षा फोल ठरत आहे. यामुळे युवकांचा हिरमोड होत आहे. परिणामी वाढत्या बेरोजगारीमुळे अनेक युवक विविध मोर्चा, धरणे, आंदोलन आदींमध्ये गुरफटत आहे.चौकाचौकात सुशिक्षित बेरोजगारांचे घोळके दिसून येत आहे. यातून चिडीमारीचे प्रमाण वाढत आहे. युवकांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्या पालकांचा जीव कासावीस होत आहे. कोरोनाच्या सावटात ही समस्या आणखी बिकट झाली आहे. आधीच बेरोजगार असलेल्या युवकांमध्ये आता नवीन बेरोजगारांची भर पडत आहे. अनेकांचे व्यवसाय ठप्प पडल्याने तेसुद्धा बेरोजगार झाले आहे.साखर कारखाना तीन वर्षांपासून बंदचतालुक्यासाठी कामधेनू ठरलेला पोफाळीचा वसंत सहकारी साखर कारखाना गेल्या तीन वर्षांपासून बंद आहे. या कारखान्यावर अनेकांची उपजीविका चालत होती. कारखाना बंद असल्यामुळे तालुक्यातील प्रत्येक गावातील किमान १०० युवक रोजगाराच्या शोधात आहे. लोकप्रतिनिधी आणि शासन उदासीन असल्याने युवक, शेतकरी, व्यावसायिक सर्वच त्रस्त आहे.