शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

अखेर वसंतच्या कामगारांचे आंदोलन मागे

By admin | Updated: November 9, 2014 22:35 IST

वसंत सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनीे विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन सुरू केले. परंतु कारखान्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता माजी आमदार बापुराव पाटील आष्टीकर

उमरखेड (कुपटी) : वसंत सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनीे विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन सुरू केले. परंतु कारखान्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता माजी आमदार बापुराव पाटील आष्टीकर यांनी कामगारांची समजूत काढली. प्रशासन आणि कामगारातला वाद मिटवत काही मागण्या मान्य करण्यात आल्या. त्यामुळे कामगारांनी आंदोलन मागे घेतले. दोन दिवसापासून वसंतच्या कामगारांनी कामबंद आंदोलन केले. या दरम्यान अध्यक्ष प्रकाश पाटील देवसरकर व कामगार संघटनेचे अध्यक्ष पी.के. मुडे यांच्यात चांगलीच जुंपली होती. ऐन गळीत हंगामाच्या तोंडावर प्रशासन व कामगारांमध्ये सात महिन्यांच्या वेतन थकबाकीमुळे संघर्ष निर्माण झाला होता. त्यामध्ये दोन्ही बाजूच्यावतीने परस्पर विरोधी विधाने झाली. त्यामुळे तणाव वाढतच गेला. साखर कारखाना प्रशासन आणि कामगारांमध्ये संघर्षाची ठिणगी पडून विदर्भात एकमेव सुरू असलेला साखर कारखाना बंद पडतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. या घटनेचे गांभीर्य ओळखून वसंत कारखान्याचे माजी अध्यक्ष तथा माजी आमदार बापुराव पाटील आष्टीकर तेथे दाखल झाले. त्यांनी हस्तक्षेप करीत कामगार संघटनेची समजूत काढली. दहा हजारावरील ऊस उत्पादक शेतकरी आणि शेकडो कामगारांचा विचार करून कारखाना जिवंत ठेवण्याची विनंती माजी आमदार आष्टीकर यांनी कामगार नेते पी.के. मुडे आणि व्ही.एम. पतंगराव यांना केली. तसेच सहज निकाली काढता येईल अशा प्रश्नांवर चर्चा केली. त्यामध्ये कामगाराच्या थकीत रकमेची सेवानिवृत्त कामगार आणि नव्याने भरती झालेल्या २४२ कामगारांच्या वाढीव वेतनाबद्दल चर्चा केली. तसेच ३० नोव्हेंबरला एक वेतन देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. शिवाय थकीत वेतनाची रक्कम लवकरात लवकर मिळण्यासाठी माजी मंत्री मनोहरराव नाईक, माजी आमदार अ‍ॅड.अनंतराव देवसरकर आणि कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश पाटील देवसरकर यांच्या सोबत चर्चा करून तोडगा काढण्याचे ठरले. त्यामुळे दोन दिवसापासून सुरू असलेले आंदोलन कामगारांनी मागे घेतले. (वार्ताहर)