चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार भावंडांचा मृत्यू

By विलास गावंडे | Updated: March 12, 2024 21:22 IST2024-03-12T21:21:03+5:302024-03-12T21:22:35+5:30

यवतमाळच्या बाभूळगाव तालुक्यातील घटना

Two-wheeler collision with four-wheeler, siblings killed | चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार भावंडांचा मृत्यू

चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार भावंडांचा मृत्यू

बाभूळगाव (यवतमाळ) : चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार दोन भावंडांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास धामणगाव मार्गावरील नांदुरा पुलाजवळ घडली. गौरव सुरेश राड्री (वय २०) व पुरुषोत्तम श्रीधर राड्री (२६) रा. उसळगव्हाण (ता. देवगाव, जि.अमरावती) अशी मृतांची नावे आहे.

देवगावकडून यवतमाळकडे जाणाऱ्या क्रेटा चारचाकी वाहनाची विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकी वाहनाला धडक बसली. पुरुषोत्तम श्रीधर राड्री व त्याचा चुलतभाऊ गौरव सुरेश राड्री हे दुचाकीने गावाकडे परत जात होते. नांदुरा पुलाजवळ देवगावकडून यवतमाळला जात असलेल्या क्रेटा (क्र. टीएस ०१- इआर ०८०१) या वाहनाची व दुचाकीची धडक झाली.

दुचाकीवरील गौरव सुरेश राड्री याचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकी चालक पुरुषोत्तम राड्री याचा रुग्णालयात मृत्यू झाला.
या घटनेची तक्रार जनबा दादाराव रेवळे (रा. उसळगव्हाण) यांनी बाभूळगाव पोलिस ठाण्यात दिली. या प्रकरणी चारचाकी वाहनाचा चालक विनीत संदीप अग्रवाल (रा. भुगतपूर, आंध्र प्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Web Title: Two-wheeler collision with four-wheeler, siblings killed