नेरमध्ये आणखी दोघे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 05:00 IST2020-05-09T05:00:00+5:302020-05-09T05:00:07+5:30

गंभीर म्हणजे शुक्रवारी सकाळी आढळलेले दोन्ही रुग्ण नेर शहरातील रहिवासी आहे. दोन दिवसापूर्वी नेरमधीलच एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. शुक्रवारी मेडिकलमध्ये दाखल झालेल्या अहवालानुसार नवे दोन रुग्ण हे नेरच्या पहिल्या रुग्णाचे नातेवाईक (आई आणि मुलगा) आहे. शुक्रवारी सकाळी प्राप्त झालेल्या २३ अहवालांपैकी २१ निगेटिव्ह आले. तर शुक्रवारी पुन्हा ५७ जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.

Two more corona positive patients in Ner | नेरमध्ये आणखी दोघे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

नेरमध्ये आणखी दोघे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

ठळक मुद्देमायलेकाचा समावेश : जिल्ह्याची रुग्ण संख्या शतकाच्या उंबरठ्यावर

लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : कोरोना विषाणूने आता जिल्ह्याला घातलेला विळखा करकचून आवळणे सुरू केले आहे. शुक्रवारी सकाळी आणखी दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बाब निष्पन्न झाली. त्यामुळे वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाग्रस्तांची संख्या ८४ झाली असून आतापर्यंतच्या एकंदर रुग्णांचा आकडा ९६ वर पोहोचला आहे.
गंभीर म्हणजे शुक्रवारी सकाळी आढळलेले दोन्ही रुग्ण नेर शहरातील रहिवासी आहे. दोन दिवसापूर्वी नेरमधीलच एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. शुक्रवारी मेडिकलमध्ये दाखल झालेल्या अहवालानुसार नवे दोन रुग्ण हे नेरच्या पहिल्या रुग्णाचे नातेवाईक (आई आणि मुलगा) आहे. शुक्रवारी सकाळी प्राप्त झालेल्या २३ अहवालांपैकी २१ निगेटिव्ह आले. तर शुक्रवारी पुन्हा ५७ जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. नेर शहरातील आणखी काही जणांचे नमुने पाठविले जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. शुक्रवारच्या अहवालांनी जिल्ह्याची, त्यातल्या त्यात नेर तालुक्याची चिंता वाढविली आहे.

दिवसभरात ४६ अहवाल निगेटिव्ह
यवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्डात सध्या १३९ व्यक्ती भरती आहे. त्यापैकी ५५ प्रिझमटीव्ह केसेस असल्याचे मेडिकल प्रशासनाने कळविले. शुक्रवारी दिवसभरात ४८ जणांचे अहवाल आले. त्यापैकी दोन पॉझिटिव्ह तर ४६ निगेटिव्ह आहेत. सुरुवातीपासून आजवर यवतमाळातून १४२६ नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. त्यापैकी १२७३ नमुन्यांचे अहवाल मिळाले. त्यातील ११७२ निगेटिव्ह आहेत. तर १५३ अहवालांची प्रतीक्षा आहे. दरम्यान कोरोनाची भीती घालविण्यासाठी मेडिकल प्रशासनाने ‘कोविड-१९ मनोधैर्य’ ही हेल्पलाईन सुरू केली आहे. लॉकडाऊनमुळे प्रत्येक जण घरात बंदिस्त झाल्याने वेगवेगळे मानसिक परिणाम होत आहे. अस्वस्थता, चिंता, नैराश्य, भीती किंवा कोरोना फोबिया निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य समुपदेशन केंद्राचा सर्वांना लाभ घेता यावा, यासाठी ७५८८६८१६८८ हा हेल्पलाईन क्रमांक अधिष्ठाता डॉ. आर.पी. सिंग, डॉ. मिलिंद कांबळे, डॉ. आर.के. राठोड यांच्या मार्गदर्शनात मनोविकृतीशास्त्र विभागाने सुरू केला आहे.

Web Title: Two more corona positive patients in Ner