शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

हापशीवर दोन तासानंतर दोन गुंड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 22:20 IST

नळ येणे बंद झाले. नगरपरिषदेचे टँकरही वेळेवर येत नाही. हापशीवर जावे तर लांबच लांब रांग. दोन तासाच्या प्रतीक्षेनंतर मिळते केवळ दोन गुंड पाणी. रात्रभर त्यासाठीही वाद-विवाद आणि भानगडी हे चित्र आहे, पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या यवतमाळ शहरातील मागासवस्त्यांचे.

ठळक मुद्देरात्रभर जागरण : झोपडपट्टी परिसरातील नागरिकांचे पाण्यासाठी प्रचंड हाल

ज्ञानेश्वर मुंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नळ येणे बंद झाले. नगरपरिषदेचे टँकरही वेळेवर येत नाही. हापशीवर जावे तर लांबच लांब रांग. दोन तासाच्या प्रतीक्षेनंतर मिळते केवळ दोन गुंड पाणी. रात्रभर त्यासाठीही वाद-विवाद आणि भानगडी हे चित्र आहे, पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या यवतमाळ शहरातील मागासवस्त्यांचे. रात्रभर जागूनही पुरेसे पाणी मिळत नसल्याने आता यवतमाळकरांच्या संयमाचा बांध फुटत आहे.बेंबळाचे पाणी येणार, गोखीचे पाणी पोहोचणार अशा राजकीय वल्गनाही कोरड्या ठरल्या. शहरातील प्रत्येक भागात पाण्यासाठी हाहाकार उडाला आहे. मागासवस्त्यांमध्ये तर पाण्याशिवाय दुसरा कोणताच चर्चेचा विषय नाही. पाणी कसे मिळवायचे याचीच रात्रंदिवस चिंता असते. नगरपरिषदेचे टँकर वेळेवर येत नाही, आले तरी तोंड पाहून पाणी वाटतात. काही भागात तर आठ-आठ दिवस टँकरचे दर्शनही होत नाही. नळाची तर आशाच यवतमाळकरांनी सोडली आहे. अशा परिस्थितीत परिसरात असलेले हातपंप (हापशी) एकमेव आधार ठरत आहे. परंतु या ठिकाणीही रात्रंदिवस प्रचंड गर्दी असते. पाण्याचे भांडे ठेऊन दोन-दोन तास प्रतीक्षा करावी लागते. एकदाचा नंबर लागला की प्रचंड परिश्रमाने हापसून पाणी येते. दोन गुंड भरत नाही तोच दुसरा ओरडायला सुरुवात करतो आम्हालाही पाणी मिळू द्या, असे म्हणत आपला गुंड हापशी खाली लावतो. यातून अनेकदा भानगडी होतात. पाण्यावरून वाद होण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहे.रोजमजुरी बुडवून अनेक जण सायकलला पिंप बांधून घरी पाणी आणत आहे. शुद्ध-अशुद्ध पाण्याचा विचार न करता पाणी मिळते ना यावरच समाधान मानावे लागत आहे. अशा भीषण परिस्थितीत आता नगरसेवकही वार्डात यायलाच काय फोनही उचलायला घाबरत आहे. नागरिकांच्या रोषाला बळी पडावे लागत असल्याने त्यांचीही मोठी पंचाईत झाली आहे. पाणी आणायचे कोठून आणि वितरण करायचे कसे असा प्रश्न आहे. वस्तीत टँकर आला की पाण्यावरून वाद सुरू होतो. याचाही धसका अनेक टँकर चालकांनी घेतला आहे. काही भागात तर टँकर चालक जायलाही तयार नाही. नागरिकांच्या संयमाचा बांध फुटत असल्याने यवतमाळची ही पाणीटंचाई कोणत्या स्तराला जाईल, हे सांगता येत नाही.पाण्याच्या शोधात डोळ्यात पाणीनळाचे पाणी येण्याची कोणतीही शक्यता नाही. प्रत्येक जण आपल्या पद्धतीने पाण्याचा शोध घेत आहे. दररोज पालिकेसह जिल्हा कचेरीवर मोर्चे धडकत आहे. परंतु आश्वासनापलीकडे काहीही होत नाही. आता यवतमाळात नळाला पाणीच नसल्यामुळे नागरिकांच्या डोळ्यात पाणी येण्याची वेळ येऊन ठेपली आहे. निगरगट्ट यंत्रणा आजही गोखी-बेंबळाचे पाणी येणारच असे सांगत आहे. परंतु दिलेल्या तारखाही उलटत असल्याने त्यांच्या घशालाही आता कोरड पडली आहे. पाणी आणायचे कुठून हाच खरा प्रश्न आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई