अज्ञात वाहनाच्या धडकेत मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोघांचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 10:50 IST2021-12-02T10:50:02+5:302021-12-02T10:50:50+5:30
अमोल गाडेकर, विवेक ठाकरे व पंकज उईके हे तिघेही गुरूवारी पहाटे बाभुळगाव रोडवर व्यायामासाठी फिरायला गेले होते. दरम्यान सकाळी सहाच्या सुमारास ते आष्टी फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला व्यायाम करत होते.

अज्ञात वाहनाच्या धडकेत मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोघांचा जागीच मृत्यू
यवतमाळ- कळंब येथील बाभुळगाव रोडवरील आष्टी फाट्याजवळ गुरूवारी सकाळी 6 वाजताच्या दरम्यान मॉर्निग वॉकला गेलेल्या दोन युवकांना अज्ञात वाहनाने धडक दिली. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अमोल बबन गाडेकर (वय ३८) आणि विवेक वासुदेव ठाकरे ( क्य ४२) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही पिंपळगाव (होरे) येथील रहिवासी आहेत.
अमोल गाडेकर, विवेक ठाकरे व पंकज उईके हे तिघेही गुरूवारी पहाटे बाभुळगाव रोडवर व्यायामासाठी फिरायला गेले होते. दरम्यान सकाळी सहाच्या सुमारास ते आष्टी फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला व्यायाम करीत असताना पंकज उईके शौचासाठी काही अंतरावर गेले होते. त्याचवेळी कळंबवरून बाभूळगावकडे जाणाऱ्या चार चाकी अज्ञात वाहनाने रस्त्याच्या बाजूला व्यायाम करणाऱ्या दोघांना चिरडले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.