मालवाहू वाहनाच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू

By विलास गावंडे | Updated: March 3, 2024 21:25 IST2024-03-03T21:24:43+5:302024-03-03T21:25:09+5:30

यवतमाळ जिल्ह्यात महामार्गावरील घटना

Two bikers killed in collision with cargo vehicle | मालवाहू वाहनाच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू

मालवाहू वाहनाच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू

आर्णी (यवतमाळ) : भरधाव मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार दोघांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील दहीसावळी (ता.आर्णी) फाट्याजवळ घडली. किरण वसंतराव मुजमुले (३०) व सिराउद्दीन ग्यासुद्दिन भाटी (३०) रा. कवठा बाजार, ता.आर्णी, अशी मृतांची नावे आहेत.

कवठा बाजार येथून हे दोघे एमएच २९ - एएस २५९५ या क्रमांकाच्या दुचाकीने धनोडाकडे जात होते. दहीसावळी फाट्याजवळ दुचाकीला बोलेरो पिकअप या मालवाहू वाहनाने धडक दिली. यात किरण वसंतराव मुजमुले याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सिराउद्दीन ग्यासुद्दिन भाटी गंभीर जखमी असल्याने त्याच्यावर लोणबेहळ येथील रुग्णालयात उपचार करून यवतमाळ येथे हलविण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती होताच महामार्ग पोलिस उपनिरीक्षक विकास खडसे, सुभाष नागदिवे, सुरेंद्र वासनिक आदी घटनास्थळी दाखल झाले होते.

Web Title: Two bikers killed in collision with cargo vehicle