करणच्या खुनात दोघांना अटक, पोलीस आठ जणांच्या मागावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 05:00 IST2021-06-26T05:00:00+5:302021-06-26T05:00:06+5:30
दिनेश उर्फ अमित मधुकर तूरकर (२५, रा. पुष्पकनगर, बाभूळगाव), धीरज सुनील मैद उर्फ बेंड (१९, रा. वंजारी फैल, यवतमाळ) असे अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. दिनेश तूरकर याच्याकडे खुनाचा मुख्य सूत्रधार आशिष दांडेकर उर्फ बगिरा याने तीन देशी पिस्टल दिले हाेेते. त्यापैकी दाेन पिस्टल ते घेऊन गेले. पाेलिसांनी दिनेश तूरकर याच्याकडून एक देशी पिस्टल जप्त केले.

करणच्या खुनात दोघांना अटक, पोलीस आठ जणांच्या मागावर
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरातील स्टेट बॅंक चाैकात करण पराेपटे याचा अक्षय राठाेड टाेळीच्या सदस्यांनी गाेळ्या घालून खून केल्याची घटना घडली हाेती. या गुन्ह्याचा पोलिसांनी तपास सुरू केला असून, दाेन संशयित आराेपींना बाभूळगाव परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता २९ जूनपर्यंत पाेलीस काेठडी सुनावण्यात आली.
दिनेश उर्फ अमित मधुकर तूरकर (२५, रा. पुष्पकनगर, बाभूळगाव), धीरज सुनील मैद उर्फ बेंड (१९, रा. वंजारी फैल, यवतमाळ) असे अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. दिनेश तूरकर याच्याकडे खुनाचा मुख्य सूत्रधार आशिष दांडेकर उर्फ बगिरा याने तीन देशी पिस्टल दिले हाेेते. त्यापैकी दाेन पिस्टल ते घेऊन गेले. पाेलिसांनी दिनेश तूरकर याच्याकडून एक देशी पिस्टल जप्त केले. गुन्ह्यातील इतर आराेपी फरार असून, त्यांची माहिती मिळविण्याकरिता पाेलिसांनी न्यायालयाकडे आराेपींच्या पाेलीस काेठडीची मागणी केली होती. न्यायालयाने आराेपींना २९ जूनपर्यंतची काेठडी सुनावली आहे.
पसार आठ आराेपींचा शाेध घेण्यासाठी पोलिसांनी तीन पथके गठित केली आहेत. स्थानिक गुन्हे शाखा, शहर पाेलीस ठाण्यातील शाेध पथक, उपविभागीय पाेलीस अधिकारी यांचे पथक आराेपींच्या मागावर आहेत. अटकेतील आराेपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, संपूर्ण घटनाक्रमच सांगितला आहे. त्या आधारावर इतर आराेपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे पाेलिसांनी सांगितले.
करणच्या खुनाने जिल्ह्यातील गुन्हेगारीचे भयावह चित्र पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
औरंगाबादला ८ जून राेजी रचला कट
- करण पराेपटे याच्या खुनाचा कट हा औरंगाबाद येथे रचण्यात आल्याचे पाेलीस तपासात पुढे आले आहे. करणच्या हत्येतील सर्व आराेपींचे ८ जून राेजी औरंगाबाद येथे लाेकेशन असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या कटाचा सूत्रधार हा अक्षय राठाेड असल्याने निश्चित मानले जात आहे. त्याच दिशेने पाेलिसांचा तपास सुरू आहे