शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

निम्म्याच शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानीचा निधी वळता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2020 05:00 IST

दिवाळीपूर्वी ही मदत बॅंक खात्यात जमा होईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील ४९ हजार शेतकरी मदतीस पात्र ठरले आहे. या पैकी २१ हजार ५६९ शेतकऱ्यांच्या खात्यात गुरुवारी ही मदत वळती करण्यात आली. यातील निम्मे शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहे.

ठळक मुद्देहवे होते २४ कोटी, जमा झाले १२ कोटी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जून ते ऑक्टोबर महिन्यात बरसलेल्या अतिपावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. चार लाख हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रात नुकसान झाले असले तरी शासनाच्या प्राथमिक अहवालात ३४ हजार ८०८ हेक्टरवरील क्षेत्र ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसानग्रस्त असल्याची नोंद आहे. यामुळे राज्य शासनाने जिल्ह्याला त्यानुसार हेक्टरी दहा हजार रुपयांची मदत वळती केली आहे. दिवाळीपूर्वी ही मदत बॅंक खात्यात जमा होईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील ४९ हजार शेतकरी मदतीस पात्र ठरले आहे. या पैकी २१ हजार ५६९ शेतकऱ्यांच्या खात्यात गुरुवारी ही मदत वळती करण्यात आली. यातील निम्मे शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहे. यामुळे कही खुशी कही गम असे चित्र गावात आहे.

केवळ २७५ गावांनाच मिळणार मदत जून ते सप्टेंबरमध्ये २१२ गावांमध्ये ३३ टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाले. तर ६१ गावांमध्ये ऑक्टोबर महिन्यात ६५ मिमी पेक्षा अधिक पाऊस बरसला. निकषानुसार दोन हजार ३९ गावांपैकी २७५ गाव मदतीला पात्र ठरले. तर १७६४ गाव अजूनही मदतीच्या निकषाबाहेर आहे. या संदर्भात पालकमंत्र्यांनी सुधारित प्रस्ताव पाठविला आहे. 

यावर्षीच्या खरीप हंगामात सर्वाधिक नुकसान झाले आहे.   या परिस्थितीत राज्य शासनाने जाहीर केलेली मदत दिलासा देणारी होती. ही मदत अद्यापही आमच्या खात्यामध्ये जमा झाली नाही. - प्रेम मुराब, शेतकरी