लोकमत न्यूज नेटवर्कनेर : ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी’ याप्रमाणे मानवाला वृक्षांची कितपत गरज आहे याची सर्वांना कल्पना आहे. जागोजागी जेव्हा वृक्षांची कत्तल वाढली, जंगले विरळ झाली तेव्हा निसर्ग आणि पर्यावरणाचा समतोल ढासळला. यानंतर शासनाने वृक्षसंवर्धनाच्या विविध योजना अंमलात आणल्या. मात्र अनेक ठिकाणी या कागदावर राहिल्या किंवा नाममात्र ठरल्या. काही झाडे पाण्याअभावी कोमेजली. ही दशा थांबली जावी यासाठी काही वृक्षप्रेमींनी पर्यावरण संवर्धन मंडळाची निर्मिती केली. पाच-पन्नास नव्हे तर तब्बल ५०० झाडे त्यांनी जगविली. संवर्धनाची जबाबदारी या मंडळातील सर्वांनी उचलली. सुरुवातीला नेमक्या लोकांचा सहभाग या संवर्धन मंडळात होता. पुढे-पुढे वृक्षप्रेमींची संख्या यामध्ये वाढत गेली. लावलेली वृक्ष जगविण्यासाठी मंडळातील सदस्यांनी प्रत्येकी ५०० रुपये गोळा केले. यातून लोखंडी ट्री गार्ड खरेदी करून लावण्यात आले. शहरातील स्मशानभूमी परिसर, एसटी आगार, तहसील कार्यालय, न्यायालय परिसर, अमरावती रोड आदी भागात लावलेल्या या गार्डमुळे वृक्षांचे संरक्षण होत आहे. अॅड. बाबा चौधरी, राजेश चौधरी यांनी ट्री गार्डसाठी १५ हजार रुपयांची मदत केली. मंडळातील युवक दररोज भर उन्हात झाडांना पाणी देत आहेत. यामुळे वृक्षसंवर्धनाची चळवळ तेजोमय होत आहे. हीच आता प्रत्येक गावाची गरज बनली आहे.भर उन्हात ते देतात झाडाला पाणीउन्हाच्या तडाख्याने दुपारच्यावेळी कुणी सहजासहजी बाहेर पडण्यास धजावत नाही. मात्र पर्यावरण संवर्धन मंडळातील आकाश काळे, कौस्तुभ ढवळे, रामेश्वर पवार, संकेत ठाकरे, चेतन ढोरे, सागर गुल्हाने, विशाल गोंडाने, रवींद्र जीपकाटे ही मंडळी झाडे जगविण्यासाठी भर उन्हात पाणी देतात. त्यांची ही धडपड कौतुकास्पद आहे.
उत्स्फूर्त सहभागाने वृक्षसंवर्धन चळवळ तेजोमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 21:50 IST
‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी’ याप्रमाणे मानवाला वृक्षांची कितपत गरज आहे याची सर्वांना कल्पना आहे. जागोजागी जेव्हा वृक्षांची कत्तल वाढली, जंगले विरळ झाली तेव्हा निसर्ग आणि पर्यावरणाचा समतोल ढासळला. यानंतर शासनाने वृक्षसंवर्धनाच्या विविध योजना अंमलात आणल्या.
उत्स्फूर्त सहभागाने वृक्षसंवर्धन चळवळ तेजोमय
ठळक मुद्देसंडे अँकर । नेरमध्ये ‘कारवा बनता गया’, पर्यावरण संवर्धन मंडळाची निर्मिती, ट्री गार्डसाठी प्रत्येकी ५०० रुपये