परवानगी नसलेल्या शेतात कंत्राटदाराने केली कटाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 05:00 IST2020-06-05T05:00:00+5:302020-06-05T05:00:23+5:30

जोडमोहा वनपरिक्षेत्रात येत असलेल्या वटबोरी शिवारात रतन दमाये या शेतकऱ्यांच्या शेतातील सागवान कटाईची परवानगी घेण्यात आली. या एकाच परवानगीच्या आधारावर त्याच परिसरातील पांदण रस्त्यावरील मात्र दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतातील सागवान तोडण्यात आले. नियमाप्रमाणे एका परवानगीवर त्या क्षेत्राच्या व्यतिरिक्त दुसऱ्या भागातील साग कटाई करता येत नाही.

tree cut by a contractor in an unauthorized field | परवानगी नसलेल्या शेतात कंत्राटदाराने केली कटाई

परवानगी नसलेल्या शेतात कंत्राटदाराने केली कटाई

ठळक मुद्देवटबोरीतील सागवान : ‘एसीएफ’ची अधिनस्तांकडून दिशाभूल

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जोडमोहा वनपरिक्षेत्रांतर्गत वटबोरीच्या सागवान कंत्राटदाराने परवानगी नसलेल्या मालकी शेतातील झाडांची परस्पर कटाई केली. संबंधित शेतकऱ्याला नंतर मॅनेज करण्यात आले. सहायक उपवनसंरक्षकांची स्थानिकांकडून दिशाभूल करण्यात आली. त्यामुळे हॅमर लावून कटाई केलेला माल पास करण्यात आला.
जोडमोहा वनपरिक्षेत्रात येत असलेल्या वटबोरी शिवारात रतन दमाये या शेतकऱ्यांच्या शेतातील सागवान कटाईची परवानगी घेण्यात आली. या एकाच परवानगीच्या आधारावर त्याच परिसरातील पांदण रस्त्यावरील मात्र दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतातील सागवान तोडण्यात आले. नियमाप्रमाणे एका परवानगीवर त्या क्षेत्राच्या व्यतिरिक्त दुसऱ्या भागातील साग कटाई करता येत नाही. जोडमोहात नव्याने आलेले एसीएफ अर्जूना (आयएफएस) यांचे कामकाज पारदर्शक आहे व नियमाला धरून चालणारे आहे. अशाही परिस्थितीत त्यांच्या अधिनस्त यंत्रणेने दिशाभूल करत कटाई केलेल्या मालावर हॅमर लावून घेतले आहे. हॅमर लावताना एसीएफ अर्जूना यांनी शंका व्यक्त केली होती. मात्र इतर कर्मचाऱ्यांनी त्यावेळी त्यांना परवानगी घेतलेल्या शेतातीलच माल असल्याचे सांगून वेळ मारून नेली. सागवान कंत्राटदाराच्या सोयीची भूमिका घेतली जात आहे.

Web Title: tree cut by a contractor in an unauthorized field