शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांची प्रशिक्षण वर्गाकडे धाव

By admin | Updated: May 27, 2014 01:10 IST

अमरावती शिक्षक मतदार संघाचे पडघम जोरात वाजू लागले आहे़ निवडणूक अवघ्या २५ दिवसांवर आली असून शाळांना सुट्या असल्याने शिक्षक मतदार उमेदवारांच्या हाती लागणे

शिक्षक मतदार संघ निवडणूक : सुट्यांमुळे उमेदवार सापडले अडचणीत

विनोद ताजने - वणी

अमरावती शिक्षक मतदार संघाचे पडघम जोरात वाजू लागले आहे़ निवडणूक अवघ्या २५ दिवसांवर आली असून शाळांना सुट्या असल्याने शिक्षक मतदार उमेदवारांच्या हाती लागणे कठीण झाल्याने सर्वच उमेदवारांनी प्रचारासाठी शिक्षकांचे प्रशिक्षण वर्ग लक्ष्य बनविले आहे़ विधानपरिषदेच्या अमरावती शिक्षक मतदार संघाची निवडणूक येत्या २० जूनला होणार आहे़ विद्यमान आमदारांचा कार्यकाळ १९ जुलैला संपत आहे़ त्यामुळे ही निवडणूक जुलै महिन्यातच होईल, शाळा सुरू झाल्यावर किमान १५ दिवस तरी प्रचारासाठी मिळेल, असा इच्छुक उमेदवारांचा अंदाज होता़ मात्र निवडणूक आयोगाने अकस्मात २० जून ही निवडणुकीची तारीख जाहीर केली़ विदर्भातील शाळांना येत्या २५ जूनपर्यंत उन्हाळी सुट्या राहणार आहेत़ त्यामुळे शिक्षक शाळेत तर बरे, घरीही सापडणे कठीण झाले आहे़ त्यामुळे पाच जिल्ह्यांतील तीन हजार ५०० शाळांमधील ४५ हजार शिक्षकांना भेटायचे कसे, या चिंतेने रिंगणातील उमेदवारांना चांगलेच ग्रासले आहे़ यापैकी बरेच उमेदवार मागील वर्षभरापासून कामाला लागले होते. त्यांच्या निदान एक-दोन प्रचारफेर्‍या पाचही जिल्ह्यात पूर्ण झाल्या आहेत़ काहींनी मतदारांना ‘गोडधोड’ खाऊही घातले आहे़ तरीही निवडणुकीच्या तोंडावार एकदा मतदारांपुढे जाण्याची इच्छा सर्वच उमेदवारांची होती़ मात्र उन्हाळी सुट्यांमुळे त्यांच्या इच्छेवर पाणी फेरले गेले आहे. सध्या शिक्षकांचे वरिष्ठ वेतन श्रेणीचे प्रशिक्षण सुरू आहे़ शेगाव येथे झालेल्या तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या पाच दिवसांच्या प्रशिक्षण वर्गाला सर्वच इच्छुक उमेदवारांनी भेट देऊन मतांचा जोगवा मागितला़ तब्बल ८० शिक्षकांचा तेथे एकाच वेळी संपर्क झाल्याने त्यांचा दौरा सफलही झाला़ मात्र प्रशिक्षणाचा खोळंबा झाल्याचे दिसून आले़ आता येत्या ३ जून ते १२ जून दरम्यान विभागात १४ केंद्रांवर जवळपास एक हजार शिक्षकांचे प्रशिक्षण सुरू होणार आहे़ त्यामुळे ही प्रशिक्षण केंद्रे उमेदवारांचे प्रचार केंद्रेच बनण्याची शक्यता बळावली आहे़ अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक १६ हजार २७५ शिक्षक मतदार असल्याने उमेदवारांचे लक्ष अमरावती जिल्ह्याकडे अधिक लागले आहे़ सर्वात कमी चार हजार ४१२ मतदार वाशिम जिल्ह्यात असल्याने एवढ्या मतदारांसाठी जिल्हा पिंजून काढणे जिकरीचे होणार आहे़ उमेदवारांचे भवितव्य स्थानिक कार्यकर्ते किती जोमाने काम करतात, यावरच ठरेल. शिक्षक संघटनांच्या उमेदवारांचा वरचष्मा राहण्याची शक्यता आहे़ (स्थानिक प्रतिनिधी)