शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
IPL 2026 Playoffs Race : स्क्रिप्ट भारी की, मॅच? १६ गुण कमावणाऱ्यांसाठीही पोटात गोळा आणणारा ट्विस्ट
3
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
4
IPL कॅप्टन्सीत गिलचा मोठा पराक्रम! ५०० धावांचा पल्ला गाठत विराट-सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
5
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
6
IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी
7
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
8
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
9
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
11
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
12
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
13
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
14
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
15
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
16
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
17
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
18
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
19
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
20
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मायेची ऊब ठरली बालिकेचा काळ

By admin | Updated: December 11, 2014 23:14 IST

आईच्या सहवासासाठी कोणताही जीव कासावीस होतो. त्या माऊलीच्या सहवासाची ऊब उभ्या आयुष्यात अनेक संकट झेलण्याची ताकद देते. नेर ग्रामीण रुग्णालयातील घटनेने मात्र हे सर्व परिमाण मोडीत काढले.

किशोर वंजारी - नेर
आईच्या सहवासासाठी कोणताही जीव कासावीस होतो. त्या माऊलीच्या सहवासाची ऊब उभ्या आयुष्यात अनेक संकट झेलण्याची ताकद देते. नेर ग्रामीण रुग्णालयातील घटनेने मात्र हे सर्व परिमाण मोडीत काढले. मायेची ऊबच अडीच महिन्याच्या चिमुकलीसाठी काळ ठरली. नियतीच्या या खेळीने आईवर निरागस मुलीच्या मृत्यूचे पातक ओढवले आहे. सहज लागलेला डोळा पोटाशी असलेल्या मुलीसाठी काळ ठरला.
तीन चिमुकल्यांचा सांभाळ करणारी आजंती येथील ३५ वर्षीय माता कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी नेर ग्रामीण रुग्णालयात दाखल झाली. सोबत अडीच महिन्याची चिमुकलीही होती. दुपारी पलंगावर पहुडली असताना त्या मातेचा सहज डोळा लागला. आईच्या सहवासात निर्धास्त होऊन बागडणारी ती अडीच महिन्याची बालिकाही आनंदात होती. काही क्षणातच त्या मातेचा डोळा लागला. रुग्णालयातील तो लोखंडी कॉट मायेने भारावलेला असतानाच अगदी क्षणभरात चिमुकलीच्या मृत्युचा साक्षीदार ठरला. डुलकी लागल्याने आईच्या पोटाशी असलेली बालिका कधी त्या खाली दबली हे तिला कळलेच नाही. मायेची ऊब असणाऱ्या कुशीतच दबून त्या चिमुकलीचा श्वास रोखला. मुलीला जवळ घेऊन निर्धास्तपणे वामकुकशी घेणाऱ्या मातेला हे कळलेच नाही. जेव्हा जाग आली तेव्हा नेमकं काय झालं याचं भान त्या मातेला राहिले नाही. आपल्या चिमुकलीच्या मृत्युसाठी आपणच कारणीभूत ठरलो, हे लक्षात येताच तिने हंबरडा फोडून आक्रोश व्यक्त करणे सुरू केले. नेमका काय प्रकार आहे हे लक्षात न आल्यामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसह इतरही रुग्ण, त्यांचे नातेवाईक सुन्न झाले. घटना घडली हे लक्षात आल्यानंतर उपस्थितांपैकी सर्वांनाच जबर हादरा बसला. आता या प्रकरणात कोणती नोंद घ्यावी, असा पेच नेर पोलिसांपुढे निर्माण झाला आहे.