शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
6
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
7
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
8
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
9
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
10
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
11
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
12
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
13
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
14
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
15
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
16
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
17
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
18
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
19
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
20
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
Daily Top 2Weekly Top 5

केवळ धक्का लागला म्हणून तिघांनी केले गळ्यावर चाकूने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2021 05:00 IST

ज्ञानेश्वर हरिदास ढाकणे (३१) रा. वंजारी फैल असे जखमी युवकाचे नाव आहे.  ज्ञानेश्वर हा शासकीय तंत्रनिकेतनसमाेर असलेल्या एका वाईन बारमध्ये गेला हाेता. तेथून परत येताना त्याचा एका युवकाला धक्का लागला. यावरून दाेघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. नंतर ज्ञानेश्वर धामणगाव राेड चाैफुलीवर खर्रा खाण्यासाठी थांबला. तेथे दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्याच्यावर धारदार चाकूने हल्ला केला.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात गेल्या काही दिवसांपासून अगदी क्षुल्लक कारणावरून थेट खुनाची घटना घडत आहे. मेडिकल परिसरात वैद्यकीय विद्यार्थ्याचा खून, आर्णी राेडवर वकिलावर लाेखंडी राॅडने हल्ला झाला. आता बुधवारी रात्री धामणगाव चाैफुलीवर धक्का लागला म्हणून दाेघांनी युवकाच्या गळ्यावर चाकूने दाेन वार केले. त्याने गंभीर अवस्थेत शासकीय रुग्णालय गाठले, तेथे वेळीच उपचार मिळाल्याने युवकाचा जीव वाचला. ज्ञानेश्वर हरिदास ढाकणे (३१) रा. वंजारी फैल असे जखमी युवकाचे नाव आहे.  ज्ञानेश्वर हा शासकीय तंत्रनिकेतनसमाेर असलेल्या एका वाईन बारमध्ये गेला हाेता. तेथून परत येताना त्याचा एका युवकाला धक्का लागला. यावरून दाेघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. नंतर ज्ञानेश्वर धामणगाव राेड चाैफुलीवर खर्रा खाण्यासाठी थांबला. तेथे दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्याच्यावर धारदार चाकूने हल्ला केला. त्याच्या गळ्यावर दाेन्ही बाजूने चाकूने वार करून ते तिघेही पसार झाले. रक्ताच्या थाराेळ्यात असलेल्या ज्ञानेश्वरने स्वत:ला सावरत कसेबसे शासकीय रुग्णालय गाठले. तेथे त्याच्या मानेवर डाॅक्टरांनी उपचार केले. १८ टाके जखमेवर घालण्यात आले. उपचार घेतल्यानंतर गंभीर अवस्थेतच ज्ञानेश्वर ढाकणे शहर पाेलीस ठाण्यात पाेहाेचला. त्याच्या तक्रारीवरून आराेपी अतुल पुरी (३८), जगदीश मिसाळ (४०) व कांबळे  नामक युवक तिघेही रा. विसावा काॅलनी  यांच्या विराेधात कलम ३०७, २९४, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर शहर पाेलिसांनी  तत्काळ आराेपींचा शाेध घेणे सुरू केले. यातील जगदीश मिसाळ व अतुल पुरी या दाेघांना अटक केली. तिसऱ्या आराेपीच्या शाेध पाेलीस घेत आहेत.या घटनेत दोघांना अटक करण्यात आली आहे. मात्र काही दिवसांपूर्वी भररस्त्यात वकिलावर प्राणघातक हल्ला करून पळालेला आरोपी अद्यापही मोकाट आहे. किरकोळ वादातून जीवघेणा हल्ला करण्याचे प्रकार वाढत असताना असे आरोपी मोकाट फिरणे नागरिकांच्या मनात दहशत वाढविणारे ठरत आहे. त्यामुळे बुधवारच्या घटनेतील तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी